वर्षाविहार २०१३: संयोजक आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by admin on 22 March, 2013 - 00:13

यंदाचा (२०१३) वर्षाविहार हा आपला ११वा ववि आहे.. दहा वर्ष दणक्यात झालेल्या या उपक्रमात आता नवीन काहितरी भर टाकली पाहिजे , याचं स्वरुप बदललं पाहिजे असा विचार आहे. पण काय आणि कसं ते नक्की ठरलेलं नाही...

या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक आणि त्याचबरोबर नवीन कल्पना...आणि त्याला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आजच धागा सुरू करत आहोत.

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> येंदा तू हेस की काय संभावित संयोजक समितीत???? <<<< नाय ब्वॉ ! अस्लि काम मला जमत नाईत.
अन त्यातुन मी त्या समितीत गेलोच तर "ववि दक्क्ष" ते "ववि विकीर" होईल, त्याचे काय करणार तुम्ही? Lol त्यापेक्षा ते संयोजक समिती /सांस्कृतिक समिती वगैरेच ठीके, नै?

ठिकाण, संयोजक ठरले का?>>>>

अजुन वळीव नाही आला त्यामुळे बहुतेक ठरेना...

| 7 May, 2013 - 17:09
तारीख = जुलै महिन्यातील १ उनाड रविवार.
अनिलभाई | 7 May, 2013 - 17:12
किवा ऑगस्टचा पहीला रविवार.

..

पुणे समिती खालील्प्रमाणे :-

ववि समिती:-
१.मयूरेश - मयूरेश कंटक
२.मल्लीनाथ - मल्लीनाथ करकंटी.
३.दक्षिणा - दिप्ती जोशी

टी शर्ट समिती
१.हिम्सकुल- हिमांशू कुलकर्णी
२. रुमा - ऋतुजा कंटक

सांस्कृतिक समिती
१.श्यामली- कामिनी केंभवी
२.आशू_डी - अश्विनी धर्माधिकारी

मुंबई समिती खालील्प्रमाणे :-

ववि समिती
१.घारुआण्णा - संदिप खांबेटे
२.गीतांजली - गीतांजली आचार्य.
३.आनंद्सुजु - आनंद केळकर
४.बागुलबुवा - अमित देसाई

टी शर्ट समिती
१.आनंदमैत्री- आनंद चव्हाण
२.नील वेद - निलेश वेदक
३.योकु - योगेश कुलकर्णी
४.विनय भिडे - विनय भिडे

सांस्कृतिक समिती
१.निंबुडा - शुभा मोडक
२.टोकुरिका - नेहा पनवेलकर
३.मुग्धानन्द - मुग्धा कुलकर्णी
४.मधुरा भिडे - मधुरा भिडे

मुरबाड, सरळगाव जवळील (माळशेज घाटाच्या अलिकडचे) "विसावा" रीसॉर्ट छान आहे. Happy
नाशिक, पुण्याहुन थोडे लांब पडेल. Happy

ववि आता मुंबई- पुणे महामार्गाच्या बाहेर नेऊया!> आसे म्हणणार्‍या लोकांनी आता पुढे व्हावे.

ववि आहे टी शर्ट आहे आणि बरच काही करयच आहे ... पण नाशिक कर कुठे आहेत ???

@ पौर्णिमा ववि देखील या वेळेस वेगळ्या ठिकाणी करायचा विचार आहे , त्यामुळे पुण्याहुन संख्या वाढेल अशी आशा आहे ...

'टीशर्ट आणि बरंच काही समिती' आहे का ती >>> Biggrin

ठिकाण सगळ्यांना आवडेल अस , त्यात या रुटला कधी ववि झाला नाही अस ....

@ नंदिनी .... जुलै चा शेवटचा रविवार .... आता तुला काय हे सांगायला हव ? Happy

संयोजकांचं अभिनंदन करायचं राहिलं. Happy

सर्व संयोजकांचं अभिनंदन आणि शुभेच्छा!!
काही मदत लागली तर कळवा नक्की.

Pages