नाचणी + मश्रुम्स चे परोठे

Submitted by मोहन की मीरा on 21 March, 2013 - 23:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नाचणीचे पीठ - १ कप
कणीक - १/२ कप
मश्रुम्स थोडे वाफवुन - ४-५ नग
छोटा कांदा
लसूण + आले पेस्ट
मीठ
हिरव्या मिरच्या ३-४

क्रमवार पाककृती: 

१. नाचणी + कणीक एकत्र करावी
२. वाफवलेले मश्रुम्स, हिरव्य मिरच्या, कांदा हे सगळे मिक्सर वर बारीक वाटुन घ्यायचे
३. वाटलेले मिश्रण, आले लसूण पेस्ट, मीठ पीठात घालुन किंचीत तेल घालुन गोळा मळावा. सैलसर वाटला तर जरा कणीक घालावी. पण फार नको.
४. छोटे गोळे करुन , लहान आकाराचे परोठे लाटावे.
५. तव्यावर नेहेमी प्रमाणे शेकुन घ्यावे.
६. लहान मुलांना द्यायचे असतिल तर थोडे साजूक तुप तवावर सोडुन मग त्यावर पराठे शेकावेत.
७. चटणी/ दही/ सॉस / लोणच्य बरोबर गट्टम करावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण छोट्या आकाराचे ६ नग होतात
अधिक टिपा: 

थोडे ड्राय वाटु शकतात. पण लावायला दही घेतले तर मजा येते. डब्यात द्यायला उत्तम... मी स्वतः मश्रुम खात नाही. पण ते पोटात जावे म्हणुन ही युक्ती...

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव भारी आहे, लागण्यार्‍या वेळेसकट. Happy
पीठ भिजवायला पाणी लागत नसेलच ना, कांदा आणि मश्रुमच्या ओलसरपणामुळे?
मश्रुम्स वाफवून मऊ व्हायला कीती वेळ लागतो अंदाजे? मी कधी केले नाहीयेत म्हणुन विचारतेय..

धन्स.. लोक्स

मश्रुम्स मी साधारण ३-४ मि. वाफवले. जास्त नाही... पाणी पण जास्त नाही लागत भिजवायला . कारण कांदा+ मश्रुम्स च्या मिश्रणात मी वाटताना थोडे पाणी घातले होते. ते मात्र अगदी बारीक वाटायचे.. कारण आपण हे पराठे लाटुन करतो ना... थालीपीठा सारखे थापता पण येतिल. त्या वेळेस कणिक न घालता ज्वारी पीठ वापरता येईल... चव मात्र एकदम भारी लागते. लेक आवडीने डब्यात घेवुन गेली आज...

छान रेसिपी.
थालीपीठा सारखे थापता पण येतिल. > हो. मी कालच उरलेल्या आमटीमधे कांदा,ओवा,कोथिंबीर, तांदुळ पिठी +नाचणी पीठ घालून थालीपीठ केलं होतं.

वा, नवीन आयडीया. टिनमधले मश्रुम न वाफवता तसेच वापरता येतील. ( आमच्याकडे तेच मिळतात नाहीतर सुकवलेले Happy )