तो मूर्ख एक जाणावा

Submitted by विस्मया on 20 March, 2013 - 07:32

दुनियेत प्रभा का नाही, हे ज्यास वाटते आहे
तो मूर्ख एक जाणावा, हे वचन नांदते आहे

पाहिली कधी ना ज्वारी, म्हणे बाजरी आहे
वर म्हणे कळे कोणाला, हे गाव ऐकते आहे

जो करी टिका अविचारी, आणि देतसे सल्ले
ते क्षेत्र नव्हे हो आपुले, अज्ञान सांडते आहे

व्यवसाय कसा करावा, हे कोण शिकविते आहे
गंगेत बुडाला धंदा, सांगे जे पोळते आहे

रचनेत बोध का नाही, प्रश्नातच उत्तर आहे
वाचून तुम्ही म्हणणारे, ही पोर रांगते आहे

मैत्रेयी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया कुणीही स्वतःवर ओढवून घेऊ नये ही नम्र विनंती. योगायोगाने काही साधर्म्य आढळल्यास जबाबदार नाही.

असंबद्ध आहे कविता.

कादंबर्‍याच लिहा तुम्ही, हा तुमचा प्रांत नव्हे!

बाजीराव
सल्ल्याबद्दल आभार.

(ग्रेसजींसारख्या कवींबद्दल ते गेले त्याच दिवशी ते असंबद्ध लिहीत होते... त्यांना रात्री लिहीलेलं सकाळी कळत नव्हतं... पुढचं काही इथे देण्यासारखं नाही... अशी प्रशस्तीपत्रके देणारे विद्वतजन इथे आंतरजालावर आहेत. कुणाच्या सल्ल्याला आणि मताला किती किंमत द्यायची हे ज्याचं त्याने ठरवायचं).

जो करी टिका अविचारी, आणि देतसे सल्ले
ते क्षेत्र नव्हे हो आपुले, अज्ञान सांडते आहे

व्यवसाय कसा करावा, हे कोण शिकविते आहे
गंगेत बुडाला धंदा, सांगे जे पोळते आहे

सूंदर
मूळातच कुठले क्षेत्र कुणाचे याचे कॉपीराईट कुणालाही दिलेले नाही, ज्यातून आनंद मिळतो ती रचना / क्षेत्र

कुणीही स्वतःवर ओढवून घेऊ नये >>>> Rofl

असं कसं होईल ? चोराच्या मनात चांदणं ऐकलं नाही का ? कोणतरी पडलंय जखमी होऊन, फडफड दिसली ना Wink

विस्मया ,लेखन सर्व प्रथम स्वतः साठी असते .स्वानंद हे एकच परिमाण आणि इतरांना आवडले तर तो बोनस समजावा..नाही आवडले तर आपले काय जाते ?तुम्ही तो आनंद घेत आहात घेत राहा?.ले.शु.

बाजीराव Proud

>>>लेखन सर्व प्रथम स्वतः साठी असते .स्वानंद हे एकच परिमाण आणि इतरांना आवडले तर तो बोनस समजावा<<< व्वा

Happy