Submitted by अज्ञात on 19 March, 2013 - 23:57
गहिवरले नभ भिजले कातळ भोर नवीन उगवली
वियोगव्याकुळ तरिही मन; का नयने आतुरलेली ?
कुंद सभोवर स्तब्ध चराचर प्रतिमा हिरमुसलेली
खोल दर्पणी ध्यास एक मज; स्मितरेषा का पुसलेली ?
दूर कुहुक जणु आर्त शोडषी पर कातरलेली
गूढ व्यथित आभास स्पंदने; पथी विखुरलेली
कळे न का असुनी नसलेपण आभा व्यापलेली
भेटीस्तव हुरहुर बहुधा ही; कळा भावओली
..............................अज्ञात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोड लय असलेली कविता.
गोड लय असलेली कविता.
गोड लय असलेली कविता.
गोड लय असलेली कविता.
(No subject)
आर्त शोडषी पर कातरलेली हे जरा
आर्त शोडषी पर कातरलेली हे जरा नीट कळले नाही .बाकी मस्त .