इंस्पेक्टर सचिन सूर्यवंशी यांस,

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 19 March, 2013 - 23:10

चाटतात सदा पाय
धावतात पैश्यामागे
तयाचे हे भूत तुवा
सूर्यवंशी आज लागे

मारणारे गुंड होते
त्यात नवीन काय ते
अरे पण तुम्ही तया
सदा मिरविले होते

आठवता धर्म आज
जरी केलेस चांगले
आजवरी भुजंगास
तू दुध होते पाजले

घमेंडी नृपा नावडे
सरदार बाणेदार
शिरताच सत्ता शिरी
करे प्यादेही बेजार

भीम व्हा युधिष्टीराचे
हात तुम्ही जाळणारे
रक्त दु;शासनी उष्ण
घटघटा प्राशणारे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भर मंत्रालयात घडले म्हणुन ही घटना सर्वांसमोर आलेय. अन्यथा, हे आमदार/ खारदार लोकप्लोकप्रतीनीधी नी गुंड जास्त, अशाच प्रवृत्तीचे असतात.

धन्यवाद आहना ,कांदापोहे,
खर आहे,डोक्यात तिडीक जावी अशी गोष्ट .पुढे फारसे काही होणार नाही..हि लोक पुन्हा मोकाट सुटणार ..,कुणाला काळ फासणार,कुणाला बदडणार ,पण तरीही आशा ठेवू , कदाचित त्यांचे एक गुंड पावूल तरी थबकेल काही काळ आपल्या आरडाओरडी मुळे .