थोडं तूझं थोडं माझं बोलू

Submitted by मंदार खरे on 19 March, 2013 - 07:51

तू हसलीस म्हणून मी हसायचं
तू बोललीस म्हणून मी बोलायचं
उगाच वाद नको म्हणून मी टाळणार
मत असूनही व्यक्त नाही करणार
कशाला हे असं खोटं वागायचं
काहीच घडलं नाही असं दाखवायचं
नाही कळणार कदाचित बाहेर कुणाला
पण किती फसवणार असं स्वताःला
थोडं माझं ऐक, तूझीही बाजू मांड
पटलं नाही तर हव तेवढं भांड
पाहिजे तर रेडिओचा आवाज मोठा करु
किंवा कुठे तरी दूर डोंगरावर बसू
पण एकदाचं काय ते संपवून टाकू
मनातल्या जळमटांना झटकून टाकू
मग सगळ्यांसमोर खरं खरं वागू
आपल्यातलं खरं प्रेम दुसर्‍यांना सांगू
एकदाच काय तो वाद घालू
थोडं तुझं थोडं माझं बोलू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनू. +१
अनुस्वार विसरल्यासारखे वाटतात. दुरुस्त केल्यावर अर्थ नीट पोहोचण्यास मदत होईल.

अजून बर्याच चुका Happy
हे घ्या, हा माझा प्रयत्न शुद्धलेखनाचा. सगळ्या चुका दुरूस्तं केल्याची हमी नाही पण जास्तं काही खटकत नाहीय असं वाटतय -

तू हसलीस म्हणून मी हसायचं
तू बोललीस म्हणून मी बोलायचं
उगाच वाद नको म्हणून मी टाळणार
मत असूनही व्यक्त नाही करणार
कशाला हे असं खोटं वागायचं
काहीच घडलं नाही असं दाखवायचं
नाही कळणार कदाचित बाहेर कुणाला
पण किती फसवणार असं स्वताःला
थोडं माझं ऐक, तुझीही बाजू मांड
पटलं नाही तर हवं तेवढं भांड
पाहिजे तर रेडिओचा आवाज मोठा करु
किंवा कुठे तरी दूर डोंगरावर बसू
पण एकदाचं काय ते संपवून टाकू
मनातल्या जळमटांना झटकून टाकू
मग सगळ्यांसमोर खरं खरं वागू
आपल्यातलं खरं प्रेम दुसर्‍यांना सांगू
एकदाच काय तो वाद घालू
थोडं तुझं थोडं माझं बोलू

Happy

भाव पोहोचले. आपसात भांडणे मिटवली की खरंच पुढचे बरेच कष्टं व मानसिक त्रास टाळता येतात ... पण जमायला पाहिजे ... छान विचार छान गुंफलेत Happy