गझला जगास माझ्या देऊन चाललो मी

Submitted by इस्रो on 17 March, 2013 - 11:28

त्यागून मोहमाया, येथून चाललो मी
इथले इथेच सारे, ठेवून चाललो मी

आसू कधी हसू अन, आशा कधी निराशा
अनुभूति जीवनाची, घेऊन चाललो मी

न्यायालयात इथल्या, दोषी सदैव ठरलो
दैवावरी भरोसा, ठेवून चाललो मी

पाऊस, उन, हिवाळा शैशव, तरुण, वॄध्दा
रंगात निरनिराळ्या, रंगून चाललो मी

आलास मोकळा तू, जाणारही रिकामा
हे सत्य जीवनाचे, जाणून चाललो मी

गझलेशिवाय मजला, जमले कधी न काही
गझला जगास माझ्या, देवून चाललो मी

- नाहिद नालबंद [भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०, ]
[ईसंपर्क : nahidnalband@gmail.com]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथले इथेच सारे, ठेवून चाललो मी

वा वा काय सहज मिसरा आहे.

गझलेशिवाय मजला, जमले कधी न काही
गझला जगास माझ्या, देवून चाललो मी

मस्त खयाल

कळावे

गं स