काय वाटतं या दिवाळीत?

Submitted by pahaat on 20 October, 2008 - 06:16

दर वर्षी दिवाळी आली की मागच्या अनेक दिवाळी (ळ्या?) माझ्या डोळ्यासमोरून तरळून जातात .. पण एक चित्र कधीच बदलत नाही .. ते म्हणजे सोलापूरच्या घरचं .. दिवाळी असो वा गणपती .. त्या घरामध्ये साजरे केल्याशिवाय सण आहे असं वाटतच नाही ...

दिवाळी ची कोणती गोष्ट मला सर्वात जास्त आवडत असेल? फटाके .. नवे नवे कपडे .. हे सगळं तर आहेच (पूर्वी shopping वगैरे कसं occasions ना केलं जायचं .. आता काय ! उठलं कि shopping .. काय नाविन्य राहणार आहे सणाच्या वेळी shopping चं मग? .. त्यामुळे थोडासा उत्साह कमी असतो एवढंच .. असो .. ) .. पण .. पहाटे पहाटे तेल लावून उटण्याने अंघोळ म्हणजे.. वाह वाह ..
आई नेहमी बंबामधे पाणी तापवते दिवाळी ला .. solid मजा येते .. थोडीशी थंडी .. उन उन पाणी आणि उटणं .. दिवसभर अंगाला सुवासिक तेलाचा आणि उटण्याचा वास येत असतो .. दिवस कसा प्रसन्न जातो ...
सगळ्या भावंडांनी मिळून फटाके उडवायचे .. खाऊ खायचा .. मंदिरात जायचं .. आणि सगळ्या देवांना दिवाळी च्या शुभेच्छा द्यायच्या .. Happy
लहानपणी दारात ताई ने काढलेली रांगोळी म्हणजे रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांसाठी आकर्षण असायचं .. मी आपलं उगाच शेजारी छोटंसं काहीतरी काढून हौस भागवून घ्यायचे .. !

या वर्षी मागे पाहिलं तेव्हा आठवली ती २ वर्षांपूर्वीची, अमेरिकेतली दिवाळी .. अचानक जाणं ठरलेलं कामानिमित्त...
त्या आधी मनात येउन गेलेलंच खरं तर, की ताई ची पहिली दिवाळी .. आम्ही तिच्याशिवाय आणि ती आमच्याशिवाय साजरी करणार .. पण माझं जाणं नक्की झालं आणि तिच्याकडे जाऊन दिवाळी साजरी करायचं सुद्धा .. Happy
तिला एकटं वाटू नये म्हणूनच कदाचित मला पाठवलं गेलं तिकडे असं वाटून गेलं तेव्हा क्षणभर ..

हे वर्ष परत आई, बाबा, मी एकीकडे .. भाऊ एकीकडे आणि ताई एकीकडे असं जाणार .. मी मात्र ते सगळे इथेच आहेत असं समजून त्याच उत्साहात फटाके (त्या दोघांच्या वाटणीचे पण) उडवणार आहे हे मात्र नक्की ... Happy

दीपावली अभिष्टचिंतन ... !!

गुलमोहर: