मोत्यांची माळ, जिरेटोप आणि तलवार

Submitted by विस्मया on 16 March, 2013 - 08:29

रात्री बेरात्री ऐकू येणा-या
घोड्यांच्या टापा
लेकीसुनांच्या किंकाळ्यांनी
भरलेला ताफा
दिवसासुद्धा अंधार होता
मुर्दाडांचा बाजार होता
संगमावरच्या घाटावर
मोत्यांची माळ हलली
रायरेश्वरी करंगळी
एक रक्ताने भिजली
आणाभाका, शपथा
टेकलेला माथा
आणि मग उजाडलं
अंधाराला पछाडलं
सूर्य उगवला होता
खरं सांगू का
तेव्हढाच काळ
स्त्रीला बरा होता
आणि आता
,
,
,

संगमावरून वाहणारी नदी तीच आहे
रायरेश्वरी वसणारी देवी तीच आहे
पण
ते रक्त पुन्हा वाहणारी
करंगळी असेल ?
ती मोतीमाळ रूळेल
अशी छाती कुठे भेटेल
तो जिरेटोप झेपेल
असा माथा एक उठेल ?

जगदंब जगदंब.....
ती तलवार पेलेल
असं मनगट कुठे दिसेल ?

- मैत्रेयी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

महिषा सूर मर्दिनी ,तुच आहेस आई
अष्ट भुजा भगवती उचल शास्त्र घाई .
पिता पुत्र पती थांबू नको कुणासाठी
तूच आहेस या जगाची अधिष्ठात्री

तेव्हढाच काळ
स्त्रीला बरा होता<<< येथपर्यंत फार आवडली. कदाचित येथेच मुद्दा झालाही असेही एकदा वाटले.

कवितेतून आशय चांगला व्यक्त झालाय.

तेव्हढाच काळ
स्त्रीला बरा होता<<< कदाचित येथेच मुद्दा झालाही असेही एकदा वाटले. >>>> बेफींशी सहमत.