"आत्मप्रेरणा"

Submitted by mahesh_engpune on 16 March, 2013 - 07:20

आयुष्य खरचं खुप गतीमान झालयं नाही...
रोजचे मेल्स, फोन , यातच इतकं गुरफटलोय की,
नाही म्हणायला तुझा चेहरा काही आठवत नाही.
तुला विसरलोय म्हणुन नाही तर तुला विसरायचय म्हणुन..!!
तक्रार अस्सायची माझी नेहमीची,
"वेळच मिळत नाही स्वताबद्दल विचार करायला"
अन आता मात्र स्वताला गुंफुन ठेवलय ..
कुठे म्हणुन विचारु नकोस..
आज मात्र थोडा निवांतपणाही अंगावर येतो..
नकोच वाटतो तो..
तुझी आठवणही हल्ली दुर्मिळ झालीये..
उगीच मनाला असे झासें देत राहतो..
शब्दही आजकाल येत नाहीत साथीला..
ते ही आता कंटाळलेत एक सुरी पणाला..
इथे आज त्यांनाही कुठे वेळ आहे ..

आयुष्य खरच खुप गतीमान झालयं..!!

माणसांच राहु देत गं त्यांना काय
दिलेला शब्द मोडायला असा कितीसा वेळ लागतो..
पण तु नाहीस ना एकटं पाडणार मल..
येतील् ही हजारो सावरायला मला,
अन कित्येक होतीलही पसार आपापुल्या गतीमान आयुष्यात..!!
पण मला खात्री आहे, तु माझ्याबरोबर असण्याची..
माझ्या प्रत्येक क्षणात..!!
राहशील ना माझ्याबरोबर..!!
जोवर माझा श्वास आहे तोवर..!!
कारण तुच तर मला जगणं शिकवलं..!!
सलाम आहे माझ्या "आत्मप्रेरणेला"...!!

------------------------------------------------------------------------------------------ महेश घुले...!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता भागात आवडली.
अतिस्पष्ट शेवटाने अर्थांच्या अन्य छटा हिरावल्या गेल्या की काय असे वाटले.
शुभेच्छा.