नमन

Submitted by जयश्री देशकुलकर्णी on 16 March, 2013 - 06:24

- नमन –

नमन माझे तुज विघ्नहर्त्या, श्री गणराया
आशिष द्यावे मज ही विनवणी तव पाया

नमन माझे ते स्फुर्तीदात्या सरस्वती मातेला
विनंती करिते नांदवा मज ठायी नितीमत्तेला

नमन स्वीकारा खंडेराया, करवीर निवासिनी आदिमाया
मलिन तरी पण लीन मी सर्व देवांच्या पाया

सर्वस्व माझे तू गुरुमाउली, माझी जननी
व्याकूळ पतित मी तुजसाठी माते रात्रंदिनी

धाव धाव तू माझी झरणी त्वरित मम साहाय्या
गुरुमाउली मी न सोडी आता तव पाया

सौ. जयश्री सुभाष देशकुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users