कदाचित !

Submitted by सुप्रिया जाधव. on 16 March, 2013 - 05:12

नाव त्याचे टाकले असते कदाचित...
मी स्वतःला भेटले असते कदाचित !

गिरवले अन खोडले तू नाव माझे
फुरसतीने वाचले असते कदाचित !

मिसळले असतेस जर डोळ्यांत डोळे
आसवांना रोखले असते कदाचित !

भेटला नसतास तू तुकड्यांमधे तर
जीवनाला सांधले असते कदाचित !

घेतले असतेस जर तू हात हाती
मी जगाला सोडले असते कदाचित !

केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !

अनुभवांनी शाहणी झालेच नाही...
समजुतीने वागले असते कदाचित !

लागला नाही सुगावा वादळाचा
मी किनारे गाठले असते कदाचित !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !>> हा शेर ़जब्बर्र्दस्त आवडला.. सहजपणा भावला... Happy

+१

<<<केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित >>>

इतकं वाचलं अन प्रतीसाद टायपला, मग पुढचं वाचलं.

खुपच मस्त!

घ्यायचा होतास सखया हात हाती
हो!.... जराशी लाजले असते कदाचित !>>व्वा !

केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !
>>मस्त .!!

केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !

व्वा.

गिरवले अन खोडले तू नाव माझे
फुरसतीने वाचले असते कदाचित !

केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !

याचसाठी शांत मी बसते अताशा
शब्द माझे झोंबले असते कदाचित !

सुंदर शेर! आवडले.

केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित >>>>> वा फारच छान

छान.

केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !........मस्तच Happy

घ्यायचा होतास सखया हात हाती
हो!.... जराशी लाजले असते कदाचित !

लागला नाही सुगावा वादळाचा
मी किनारे गाठले असते कदाचित !

हे २ शेर सर्वात आवडले.

वैभवजी अगदी मनापासून आवडली गझल हे सांगणे हाच एकमेव उद्देश आहे प्रतिसादाचा.
नुसतेच वृत्त/काफिया/रदीफ जमली म्हणून नाही तर गझलेचा मंत्रही पाळला गेलाय.
मागे एकदा सुप्रियाजींच्याच ५ शेरांच्या रचनेला अनेक शेर चांगले आहेत असा प्रतिसाद आला होता तो सहज आठवला म्हणून सहज गंमत म्हणून तसे लिहिले आहे. कोणास दुखवायचा हेतू नाही ( तसा तो नसतोच माझा कधी Happy )

<<<गझलुमियांचा प्रतिसाद मला नीट समजला नाही पण खूप काही सांगणारा / सूचीत करणारा असा वाटला>>>

दुटप्पीपणा सोडा वैवकु Happy

सुंदर..

या गझलेत अजून एक मजा आहे...

अनेक सानी मिसरे अनेक उला मिसर्‍यांस नवा अर्थ देतायेत... उदा.

घ्यायचा होतास माझा हात हाती
मी किनारे गाठले असते कदाचित !

लागला नाही सुगावा वादळाचा
मी स्वतःला भेटले असते कदाचित ! ... Happy

ही कशी काय मिस केली होती?

केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !<<< मस्त!

भेटला नसतास तू तुकड्यांमधे तर<<< ही ओळ तर फारच आवडली, पण शेर म्हणून नीट लक्षात आला नाही. प्रयत्न करतो पुन्हा Happy