शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या !

Submitted by राजीव मासरूळकर on 15 March, 2013 - 15:15

गझल

चंद्र मी झाकून आहे आत माझ्या
पेटलेला सूर्यही रक्तात माझ्या !

वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या !

जाळतो मी जात वशिला अन् गरीबी
ध्येयशिखरे गाठणे हातात माझ्या !

वाटता तुज जाहले बेरंग जीणे
घे सखे तू रंगुनी रंगात माझ्या !

पेरणी कवितेत अर्थाची करावी
तीच शक्ती ओततो औतात माझ्या!

जन्मलो चिखलात मी 'राजीव' होउन
वाहतो मृद्गंधही श्वासात माझ्या !

- राजीव मासरूळकर
मु. पो. मासरूळ
ता. जि. बुलडाणा
rajivmasrulkar@ ­ gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन ओळीतील अनुबंध अजून पक्के व्हावेत.

वाटले जेंव्हा तुला बेरंग जीणे >>> जगणे'ही चालेल
घे सखे तू रंगुनी रंगात माझ्या !>>> काळाचा ताळमेळ नाहीये... वर "वाटेल" किंवा खाली "घेतले" करावे लागेल.

एक उदाहरण म्हणून पहा, की आपला आशय अजून बोलका कसा व्हावा

तुडवतो मी जात वशिला अन् गरीबी
येत असतील आड जर ध्येयात माझ्या !

वरील सर्व केवळ आपल्यात चांगल्या गझलेची बीजे असल्याने लिहले आहे.

गै.स.न.

झप्पी,
विचार आवडले.
'वाटले' ऐवजी "वाटता तुज जाहले बेरंग जीणे"
असे घेतल्यास दोष राहणार नाही असे वाटते.
हार्दिक आभार !

जाळतो मी जात वशिला अन् गरीबी
ध्येयशिखरे गाठणे हातात माझ्या !

वाटले जेंव्हा तुला बेरंग जीणे
घे सखे तू रंगुनी रंगात माझ्या !

पेरणी कवितेत अर्थाची करावी
तीच शक्ती ओततो औतात माझ्या!

बहोत खूब

वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या !

हा शेर प्रत्येक मावळ्या साठी
अतिशय आवडला मक्ता ही छानच

वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या !

हा शेर प्रत्येक मावळ्या साठी >>>> अगदी अगदी.

चंद्र मी झाकून आहे आत माझ्या
पेटलेला सूर्यही रक्तात माझ्या !

वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या !

जाळतो मी जात वशिला अन् गरीबी
ध्येयशिखरे गाठणे हातात माझ्या !

वाटता तुज जाहले बेरंग जीणे
घे सखे तू रंगुनी रंगात माझ्या !


छान शेर, आवडले!