कूस स्वप्नांचीही वळते...

Submitted by बागेश्री on 14 March, 2013 - 23:37

उरी काहूर का आहे,
मन एकाकी असताना..
चंद्र आतूर का आहे,
साथ कोणीच नसताना

कुठला वारा सुटला हा
अन् पाचोळा झाला..
सारे नव्हते होत्याचे
वादळी चिन्हच नसताना?

रंगांचे फिकूटले होणे
सांज अस्ताला जाताना..
वातींचे फरफरणे खोटे
जीव जीवात नसताना...

क्षणांची होती ही पाने
पूर आठवांचा येताना,
पानांचे तरंगणे होते
डोळा पाणीच नसताना...

हे रस्ते ओलेसे
हवेला नूर ही आहे...
मातीला गंध ही ओला
आभाळी ढगही नसताना..

मनाचे गुलाबीसर होणे
निळाई गर्द होताना
कूस स्वप्नांचीही वळते
पापणी हलके मिटताना

-बागेश्री
ब्लॉग: वेणूसाहित्य
http://venusahitya.blogspot.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगांचे फिकूटले होणे
सांज अस्ताला जाताना..
वातींचे फरफरणे खोटे
जीव जीवात नसताना...<<< उत्तम

क्षणांची होती ही पाने
पूर आठवांचा येताना,
पानांचे तरंगणे होते
डोळा पाणीच नसताना...

हे रस्ते ओलेसे
हवेला नूर ही आहे...
मातीला गंध ही ओला
आभाळी ढगही नसताना..

मनाचे गुलाबीसर होणे
निळाई गर्द होताना
कूस स्वप्नांचीही वळते
पापणी हलके मिटताना<<< काव्यमय व गहिरे

कविता आवडली बागेश्री. धन्यवाद.

रंगांचे फिकूटले होणे
सांज अस्ताला जाताना..
वातींचे फरफरणे खोटे
जीव जीवात नसताना.

या उपमा अतिशय आवडल्या. स्वप्नांची कूस हा शब्दप्रयोग भयंकर आवडला.