ठरवूनही उराचा ठोका कसा चुकेना..?

Submitted by सुशांत खुरसाले on 14 March, 2013 - 10:30

ठरवूनही उराचा ठोका कसा चुकेना.?
काळीज रठ्ठ झाले माझ्या मना कळेना!

माझी, तुझी कि त्याची हे सांग एकदाचे
तू नेमकी कुणाची हेही कसे ठरेना..?

मी काल मनगटांच्या बाता जरूर केल्या
पण प्राक्तनामनीचे टळता मुळी टळेना..!

खुण रोजचीच केली ;केला जुना इशारा
कळले तिला परंतू ती आज बावरेना..!

धरणीस पाहुनी या बिजलीस मोह होतो
पण मोल मातिचे या मेघा कसे कळेना?

बदनाम जाहलो मी शब्दांध होउनीया
अश्रू तरी कसा मम डोळ्यात साकळेना..?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बदनाम जाहलो मी शब्दांध होउनीया
अश्रु तरीही माझ्या डोळ्यात साकळेना..!<<< छान

माझी तुझी कि त्याची हे सांग एकदाचे

खु रोजचीच केली ;केला जुना इशारा
कळले तिला परंतू ती आज बावरेना..!

धरणीस पाहूनी या बिजलीस मोह होतो
पण मोल मातिचे या मेघा कसे कळेना?

बदनाम जाहलो मी शब्दांध होउनीया
श्रू तरीहि माझ्या डोळ्यात साकळेना..!

असे केले की वृत्तात बसेल. कृ गै न. शुभेच्छा Happy

श्यामजी,बेफिजी, शिवमदा
प्रतिसादांबद्द्ल आभार !!
बेफिजी,आपण सुचवल्याप्रमाणे रचनेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे.

धन्यवाद.!!

धरणीस पाहूनी या बिजलीस मोह होतो<<< माफ करा, पण पाहुनी असेही करावे लागेल, ते आधी लक्षात आले नव्हते.

आता शेवटच्या ओळीत बहुधा 'मम' आणि 'माझ्या' असे आल्याने पुन्हा वृत्त बदलले आहे, तेही हवे तर बघून घ्या.

मला ज्याप्रमाणे सुचली तशीच्या तशीच इथे टाकली होती ,त्यामुळे जरा वॄत्त तपसायचे राहिले ..
यापुढे तपासूनच टाकेन .गै. न.