व्यथा

Submitted by -शाम on 14 March, 2013 - 10:07

*गझलसम्राट सुरेश भट यांचा आज १० वा स्मृतीदिन, माझी ही गझल त्यांनाच...

येणार्‍या दिवसावरती मी व्यथा रगडतो माझ्या
का उदास आतुन कोणी भोगावर रडतो माझ्या

गतकाळावर काळाने लावावा लेप कितीदा
क्षण स्मरणांचा नेमाने भिंती खरवडतो माझ्या

आठवते राष्ट्रध्वजाने गुंडाळुन आलेले शव
मग श्वास श्वास फिरफिरुनी कंठाशी अडतो माझ्या

घामाला मायपित्याच्या मी होउन सजवत नाही
पण प्रभाव त्या थेंबांचा गझलेवर पडतो माझ्या

ती जाता जाता तेंव्हा "येते मी" म्हटली होती
तो शब्द अजुनही सार्‍या रात्री कुरतडतो माझ्या

तो मावळताना म्हणतो, वाचलास आज पुन्हाही
जो हसून 'शाम' सकाळी दारास उघडतो माझ्या

...........................................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला तुलनेने कमजोर.

गतकाळावर काळाने लावावा लेप कितीदा
क्षण स्मरणांचा नेमाने भिंती खरवडतो माझ्या

आठवते राष्ट्रध्वजाने गुंडाळुन आलेले शव
मग श्वास श्वास फिरफिरुनी कंठाशी अडतो माझ्या

घामाला मायपित्याच्या मी होउन सजवत नाही
पण प्रभाव त्या थेंबांचा गझलेवर पडतो माझ्या

ती जाता जाता तेंव्हा "येते मी" म्हटली होती
तो शब्द अजुनही सार्‍या रात्री कुरतडतो माझ्या

तो मावळताना म्हणतो, वाचलास आज पुन्हाही
जो हसून 'शाम' सकाळी दारास उघडतो माझ्या-----------------व्वाहव्वा.

परंतु बाकीचे सगळे शेर जबरदस्त.

आवडली गझल.

ती जाता जाता तेंव्हा "येते मी" म्हटली होती
तो शब्द अजुनही सार्‍या रात्री कुरतडतो माझ्या

तो मावळताना म्हणतो, वाचलास आज पुन्हाही
जो हसून 'शाम' सकाळी दारास उघडतो माझ्या<<< उत्कृष्ट

=======

गतकाळावर काळाने लावावा लेप कितीदा
क्षण स्मरणांचा नेमाने भिंती खरवडतो माझ्या

आठवते राष्ट्रध्वजाने गुंडाळुन आलेले शव
मग श्वास श्वास फिरफिरुनी कंठाशी अडतो माझ्या

घामाला मायपित्याच्या मी होउन सजवत नाही
पण प्रभाव त्या थेंबांचा गझलेवर पडतो माझ्या <<< छान

मला मतलाही आवडला.

धन्यवाद

पुन्हाही आणि दारास या दोन शब्दांचे काहीतरी करता यावे. तसेच "येते मी" आणि 'तो शब्द' याचेही! कृ गै न!

वा वा... अत्तिशय आवडली गझल....

मक्ता थोडा कमी वाटला तुलनेत (वै.म. गै.न.)

-सुप्रिया.

कावळा, बागु, प्राजू, बेफि,सुप्रिया,राजीव, प्रा.देवपूरकर, समीर्,जयश्रीताई, सगळ्या सहृदयींचे खूप खूप आभार!

घामाला मायपित्याच्या मी होउन सजवत नाही
पण प्रभाव त्या थेंबांचा गझलेवर पडतो माझ्या

ती जाता जाता तेंव्हा "येते मी" म्हटली होती
तो शब्द अजुनही सार्‍या रात्री कुरतडतो माझ्या

व्वाह!!

घामाला मायपित्याच्या मी होउन सजवत नाही
पण प्रभाव त्या थेंबांचा गझलेवर पडतो माझ्या
.
ती जाता जाता तेंव्हा "येते मी" म्हटली होती
तो शब्द अजुनही सार्‍या रात्री कुरतडतो माझ्या
.
तो मावळताना म्हणतो, वाचलास आज पुन्हाही
जो हसून 'शाम' सकाळी दारास उघडतो माझ्या

सुरेख शेर! Happy

गतकाळावर काळाने लावावा लेप कितीदा
क्षण स्मरणांचा नेमाने भिंती खरवडतो माझ्या

आठवते राष्ट्रध्वजाने गुंडाळुन आलेले शव
मग श्वास श्वास फिरफिरुनी कंठाशी अडतो माझ्या

घामाला मायपित्याच्या मी होउन सजवत नाही
पण प्रभाव त्या थेंबांचा गझलेवर पडतो माझ्या >> क्लास...!!!