अंत्ययात्रा

Submitted by सुवर्णमयी on 14 March, 2013 - 00:14

हळूहळू तुम्ही दिलेल्या
नकारांची संख्या
वाढत वाढत
तिने स्वर्ग गाठला असेल
एव्हाना..

अंत्ययात्रा दिसली की
मी वळून बघत नाही
राम नाम सत्य है
चा गजर डोक्यात
अविरत सुरुच आहे

तुमच्या
इमेजला धक्का
लागणार नाही
असेच वागा

पण
माझ्या आत्म्याचे दार
अजून उघडता आलेले नाही!

तुमचा कांगावा,
तुमचा जल्लोश
थिटा पडलाय
करा प्रयत्न
द्या धडका
दार किलकिल झालं
एखादी फळी तुटली
तर
जगणं काय असतं ते
कळेल!
....
कुणाचे बालपण
स्मशानाजवळ
असणा-या घरात
जाऊ नये ...
आगामी कविता संग्रहातून
-"शक्यतेच्या परिघावरून "

सोनाली जोशी
www.sahityasanskruti.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दार किलकिल झालं
एखादी फळी तुटली
तर
जगणं काय असतं ते
कळेल!

व्वा. पूर्ण कविता समजली असे नाही. मात्र काही ओळी खूपच भिडल्या.

संग्रहासाठी अभिनंदन.