लोक

Submitted by जहीर कलाम on 12 March, 2013 - 03:48

कताह:-

मी कुठे होतो असा, कोणी घडवले मज असे…!
दैव किंवा देवता कोणी फ़सवले मज असे….!!
मेघ-मल्हारात ज्याने काळजाला जाळले-,
दीप-रागाने तयाच्या का विझवले मज असे….!!!

गज़ल…..!

जे यायचे सदा मला, भेटावयास लोक…!
आता कशास लागले, टाळावयास लोक...!१!

मी ही सदाच पोळलो, वैराण जीवनात-
राखेत चालले मला ,शोधावयास लोक….!२!

मी श्वास सोडल्यावरी,ना लाभली उसंत-
झाले किती उतावळे, जाळावयास लोक…!३!

आलो कसे बसेच ते आयुष्य संपवून-
माझे हिशोब लागले ,मांडावयास लोक…!४!

देवून कवच-कुंडले मी टाकली ‘ज़हीर’
आले सुवर्ण-दंत ही मागावयास लोक…!५!

ज़हीर कलाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वागत आपले !! Happy

----------------------------------------------

माणसांशी वागतांना, चूक होणे टाळले मी
माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी

- संध्या

जहीरजी,
मस्त. आवडली गझल .
फेसबुकवर आपलं लेखन वाचतोच. इथंही वाचायला आवडेल.

जहीरजी,
मस्त. आवडली गझल .
फेसबुकवर आपलं लेखन वाचतोच. इथंही वाचायला आवडेल.