चूक झाली....

Submitted by आनंद पेंढारकर on 12 March, 2013 - 03:01

प्रेम केले या जगावर चूक झाली
होत गेलो व्यर्थ कातर चूक झाली

चालणे गगनासवे झालेच नाही
कौल ओढुन बांधले घर चूक झाली

शेवटी कळलेच सार्‍यांना नको ते
पापणीतुन निसटली सर चूक झाली

बोलणे होते जरूरी ज्या ठिकाणी
टाळले होणे अनावर चूक झाली

द्या गुन्ह्याची कल्पना मग फास लावा
एवढेसे बोललो तर चूक झाली ?

तो कवीचा चंद्र होता स्वप्न माझे
आणली डोळ्यात भाकर चूक झाली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोलणे होते जरूरी ज्या ठिकाणी
टाळले होणे अनावर चूक झाली>>> मस्त!

सहजता आहेच, साधेपणाही.

शुभेच्छा!

तो कवीचा चंद्र होता स्वप्न माझे
आणली डोळ्यात भाकर चूक झाली

अप्रतिम शेर आहे...!! स्वप्न आणि वास्तवातला विरोधाभास ठळक झाल्याने वाह असं आपसूकच म्हणावंसं वाटतं.

( कवी आणि भाकरीचा प्रश्न याबद्दलचं असंच एक स्फुट ऑर्कुटवर वाचलं होतं. एका शेरात तो आशय पहायला मिळाला )

प्रेम केले या जगावर चूक झाली
होत गेलो व्यर्थ कातर चूक झाली>> वा! जाणवलेला फोलपणा फार सहज आलाय...

चालणे गगनासवे झालेच नाही>> मस्त मिसरा
कौल ओढून बांधले घर चूक झाली>> क्या बात....

शेवटी कळलेच सार्‍यांना नको ते
पापणीतून निसटली सर चूक झाली>> Happy

बोलणे होते जरूरी ज्या ठिकाणी
टाळले होणे अनावर चूक झाली>> सुंदर... सहज..

द्या गुन्ह्याची कल्पना मग फास लावा
एवढेसे बोललो तर चूक झाली ?>> अह्हा! लयीत एक एक शेर वाचत येताना, हा मस्तच वाटतोय

तो कवीचा चंद्र होता स्वप्न माझे
आणली डोळ्यात भाकर चूक झाली>> गूड वन

मस्त गज़ल आनंदजी....! आणखीही वाचण्यास आवडतील..
सहजता भावलीच Happy

शेवटी कळलेच सार्‍यांना नको ते
पापणीतून निसटली सर चूक झाली

बोलणे होते जरूरी ज्या ठिकाणी
टाळले होणे अनावर चूक झाली

द्या गुन्ह्याची कल्पना मग फास लावा
एवढेसे बोललो तर चूक झाली ?

>>>>>>

शेर काळजाला भिडला

व्वा ... क्या बात है

तो कवीचा चंद्र होता स्वप्न माझे
आणली डोळ्यात भाकर चूक झाली>>> सुंदर शेर

वैभवचा शेर आठवला...

"भूक जाळू लागल्यावर चंद्र भाकर होत नाही
रक्त गोठू लागल्यावर आभाळ चादर होत नाही"

छान गझल...
छोटीशी शंका <<<निसटली सर>>> इथे एका गुरूऐवजी दोन लघू वापरलेत, असं चालतं का? वृत्त भंगत नाही का?

द्या गुन्ह्याची कल्पना मग फास लावा
एवढेसे बोललो तर चूक झाली ?

तो कवीचा चंद्र होता स्वप्नमाझे
आणली डोळ्यात भाकर चूक झाली

वाह !