''ताट कोणते असेल माझ्या पुढे वाढले''- चित्रमय कविता स्पर्धा

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 12 March, 2013 - 02:46

IMG_1839.jpg

दिल्ली आणिक भंडारा पाहून वाटले
ताट कोणते असेल माझ्या पुढे वाढले

महिला सन्माना च्या इतक्या फुसक्या बाता
ताठपणाचे ओझे अवकाळीच वाकले

शिंपण होते प्रेमाचे पण अशा प्रकारे
डोळ्यांमधले अश्रू डोळ्यांमधे वाळले

मंगळसूत्रे,टिकली,कंकण बंधबंधने
कोण म्हणाले स्त्री मुक्तीचे सूप वाजले

लिहून गेलो इतक्या ओळी,कुठे समजले
अर्धोन्मिलीत डोळ्यांमधले काय वाचले

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्ली आणिक भंडारा पाहून वाटले
ताट कोणते असेल माझ्या पुढे वाढले>>>

व्वा!

स्पर्धेसाठी गझल हा कवितेचा फॉर्म थोडा अवघड व्हावा असे वाटते!

स्पर्धेसाठी शुभेच्छा.

शिंपण होते प्रेमाचे पण अशा प्रकारे
डोळ्यांमधले अश्रू डोळ्यांमधे वाळले

लिहून गेलो इतक्या ओळी,कुठे समजले
अर्धोन्मिलीत डोळ्यांमधले काय वाचले

हे सर्वात आवडले.