कसे सांगू तुला

Submitted by वैवकु on 11 March, 2013 - 12:49

कसा आहे कसे सांगू तुला
जसा आहे तसे सांगू तुला ?

असे मानव्य मेलेले इथे
कसे "ही माणसे" सांगू तुला

इथेतर दु:ख खंडीभर अजुन
किती ओंजळ-पसे सांगू तुला

विटेवरती कुठे तू विठ्ठला
मनावरचे ठसे ....सांगू तुला ?

पुढे नाही मला सांगायचे
कशाला फारसे सांगू तुला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहज

इथे तर दु:ख खंडीभर अजुन
किती ओंजळ-पसे सांगू तुला

विटेवरती कुठे तू विठ्ठला
मनावरचे ठसे ....सांगू तुला ?
व्व्व्वा ! अतिशय आवडले .

मक्ता फारसा भावला नाही. (वैयक्तिक अनुभव)

असे मानव्य मेलेले इथे
कसे "ही माणसे" सांगू तुला >>
छान शेर...

मतला जरासा खमंग हवा होता असे वाटून गेले...

इथेतर दु:ख खंडीभर अजुन
किती ओंजळ-पसे सांगू तुला

पुढे नाही मला सांगायचे
कशाला फारसे सांगू तुला

व्वा. हे दोन शेर अधिक आवडले.
मत्लाही छान.

गझल चांगली झाली आहे..

मतला सुंदर..

त्याशिवाय

इथेतर दु:ख खंडीभर अजुन
किती ओंजळ-पसे सांगू तुला

पुढे नाही मला सांगायचे
कशाला फारसे सांगू तुला

हे शेर हि उत्तम आहेत..

वैभव... खूप आवडली ही गझल..मतला सह्ज सुंदर.......खूप छान लिहिता तुम्ही..