प्रवाहवेडी...

Submitted by सुशांत खुरसाले on 11 March, 2013 - 12:01

उंबर्याला चाहूल नवी
दिशांना अन् भूल नवी
स्वप्नांनाही झूल नवी
ती येत आहे.....

मखमलीतले गाणे गाऊन
दिशादिशांचे थवे तरारून
पण मातीचे शब्द लपेटून
ती येत आहे.....

संकरातले शब्द तरीपण
ओंजळीतले तिच्या उरे मन
प्रवाहवेडी नाजूक खणखण
ती येत आहे....

अगम्य झेले तरी झेलवी
प्रतिकातले शब्द बोलवी
गमे मनाची चैत्रपालवी
ती येत आहे......

तिच्या मनीचे व्याकूळ प्याले
ओतून दिधले गोकूळ झाले
व्यर्थ जरी रे श्रेय मिळाले
ती येत आहे.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवमभौ,बुमरॅंगजी,राजीवजी,
मनापासून आभार.!

शिवमभौ तुम्ही म्हणता ते खरंय...
'प्रवाहवेडी' म्हणजेच मुळात येथे माझ्या अंतःकरणाला प्रवाही ठेवण्यासाठी जी मदत करते..
मातीचे शब्द लपेटून येणारी म्हणजे तीच !

माणूस म्हणून जगवण्यात काव्याचा असलेला वाटा इथे
नम्रपणे नमूद केला पाहिजे...

उगाच लाजवू नका शिवमभाऊ आम्हांस..
या विषयात केला तेवढा विचार अन् चिंतन कमीच आहे.