लेडी मॅकबेथ

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 11 March, 2013 - 11:46

मॅकबेथ
तुझी संदिग्धता सूर देतेय
माझ्या स्वराला.
तुझ्या घराचे वासे
अधोगामी आहेत.
तेही, नेमाने
ढासळत चाललेत.
प्रारब्धाला अंतरल्यासारखे.

लेडी मॅकबेथच्या
काळजात दडलेल्या,
एका विशाल पोकळीवर
तू लोंबकळतो आहेस
आणि
तुझ्या दु:खाशी मी!
टिप टिप गळणार्‍या
वेदनेनं
भांबावलीये माझी संवेदना.

आशेची आंधळी किनार
घेऊन तु धडपडतोयस
माकडीणीच्या पिलागत,
तुझ्या भूतकाळाला.
गच्च धरुन,

आणि तुझे हात?
ते नाहीयेत तिथं.
केवळ लेडी मॅकबेथच्या
रक्ताळलेल्या हातांशिवाय......

tumblr_ll4e8z48Q21qcbt62.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन पार्शवभूमी वाटतेय
लेडी मॅ़क्बेथ बद्दल फारशी माहीती नसल्याने कवितेस भिडता आले नाही
प्रकाशचित्र खतरनाक !!!

@वैभव ....मॅकबेथ हे शेक्सपिअरचे गाजलेले नाटक आहे. आपण विशाल भारद्वाजचा 'मकबूल' हा सिनेमा पाहीला आहे का?

तुझ्या घराचे वासे
अध आहेत.
< अध म्हणजे खाली का?

तुमची कविता भारी आहे. पहिल्यांदा वाचून समजत नाही. चारपाच वेळा वाचावी लागते. आणि दरवेळेला वाचल्यावर डोक्याला झिणझिण्या येतात.

All the perfumes of Arabia cannot sweeten these little hands असं काहीसं आठवलं प्रचि पाहून..
कवितेचं पहिलं कडवं जास्त आवडलं.

@मुग्धानंद
मी अभ्यासक नाही वाचक आहे. पण एकप्रकारे अभ्यासक ही आहेच. Happy
@नंदिनी
मॅकबेथ वाचलं असेल तर कविता समजायला खुप सोप्पी आहे. लॉर्ड मॅकबेथचं कन्फ्युजन आणि लेडी मॅकबेथला खाणारी तिच्या अपराधांची जाणीव, आणि संदिग्ध कवी अशि गुंफण आहे.
इतर सर्वांचे आभार.