हंबरून वासराले चाटते जवा गाय

Submitted by अभय आर्वीकर on 11 March, 2013 - 02:35

हंबरून वासराले

हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामधी दिसते माही माय

आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा
पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये
तवा मले पिठामधी दिसते माही माय

बाप माह्या मायच्यामांगं रोज लावी टुमनं
बास झालं शिक्षण आता हाती घेऊ दे रुम्नं
शिकून शान आता कोणता मास्तर होणार हायं?
तवा मले मास्तरमधी दिसते माही माय

काट्याकुट्या येचायाले जाये माय रानी
पायात नसे वाह्यना तिच्या फ़िरे अनवाणी
काट्याकुट्यालाही तिचे मानतं नसे पायं
तवा मले काट्यामधी दिसते माही माय

माय म्हणूनी आनंदानं भरावी तुझी ओटी
पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायच्या पोटी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावे तुझे पाय
तवा मले पायामधी दिसते माही माय

                           कवी - स्व. प्रा.स.ग.पाचपोळ
                            काव्यवाचन - विजय विल्हेकर
-------------------------------------------------
काव्यवाचन ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कवितेचे कवि श्री. प्रा.स.ग.पाचपोळ हे आहेत हे माहीत होते. खुपच भावूक करणारी ही कविता आहे.
धन्यवाद मुटेदादा.

Pages