Blood Hymns - 2

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 10 March, 2013 - 00:33

(कन्फ्युज्स्ड माणसाचा राक्षस बनत जाण्याची प्रक्रिया)
मुळांनी खोड शोषुन घेतले,
जेव्हा अ‍ॅन्जेल्स वीटेवर झोपले.
क्रुसावरती निर्वात लटकवला.
सर्वांनी त्याची भक्ती केली.
कालचा मी,
आजचा मी,
उद्याचा मीच्या,
गात्रांमध्ये राक्षस आहे.
काळ त्याला लिबरेट करेल.
देह त्याला जनरेट करेल.
पण आत्मा मी मुक्त ठेवलाय.
तो शेवटच्या खोलीत
शांतपणे मुततोय.
मुर्दाड कावळे,
लोचट भिकारी,
थंड वेश्या,
भडवे पुरोहित,
यांना घालतोय
बंबाळ तुकडे

एक तुकडा इथे भिरकावला
तिथे धावा
दुसरा या इथे आभाळात
त्यावर झेपा
स्वतःच्या विषात
स्वतःचाच बळी
अळीमिळी गुपचिळी
विकार द्या
विकार घ्या
साठवलेल्या बुरशीमागचे
सगळे सारे चोपुन घ्या

बहात्तर ठोके
सत्तर वाटले
दोन जगले
मग स्वतःच बहिरा झालो
संचित सारे पुन्हा ऐकले.
सगळे ढोसुन स्फुंदत बसलो
तेव्हा आरशामागुन तो हसला
त्याने,
ग्रंथ् पेटवले
धर्म बुजवले
कोवळी कुजकी भुल जाळली
भरल्या नाळेतले स्पर्श विझवले
माझ्या शहराचे भाग केले
सगळी सुत्रं स्वतः हलवली.
मी प्रतिकार करायला गेलो
तर मलाच आरशात ढकलले
आरशांची दार बंद केली
आणि त्यावर लेबलं लावली.
a wise man must know how to avoid deception!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पण आवडलीच
__________________________________________________________________________

अवांतर :
अरभाट्जी नमस्ते
नमस्ते मी वैभव वसंतराव कुलकर्णी -वैवकु Happy

तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे आजवर आज प्रथमच पाहण्याचा योग आला असे स्मरते आहे