Blood Hymns - 1

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 9 March, 2013 - 11:17

ही माणसं एकत्र का रहातात?
कपल्स म्हणुन?
कुटुंब बनवुन?
शहरं वसवुन?
देश, धर्म??

पावलं घेऊन जेव्हा बाहेर पडलो,
तेव्हा जाणवलं,
जिथे जिथे पोकळी आहे,
तिथे कुंटणखाने निपजलेले
आदिम संस्कृतीला पर्याय म्हणुन?
कुणास ठाऊक.
पण,
पोकळीला पर्याय नव्हते.
संदर्भ नव्हते.
तिथे आतमध्ये खुप सोप्पंय.
किंचाळू नका. श्वास घ्या.
धपापु नका. हपापुन घ्या.
पाऊस पाडा. पिकं घ्या.
एकबारी, दुबारी..
कितीही.. घ्या
एक स्तन घ्या वासनेनं
आणि दुसरा घ्या मायेनं

मग,
तशात मोकळी दारं घेऊन
एक नाशवंत बाई
माझ्या पायथ्याशी येते,
'येळकोट येळकोट
स्तनाग्र दिठी,
स्नायुंची मिठी.
मासावरच्या त्वचेसकट
थरारते मांडी'

शल्याचे अर्थ खोडत,
मी इंद्रियं उतरवतो.
माझ्या आवंढ्यावर,
सोलीव थंड जीभ घेत,
तुझी समग्र सृष्टी
माझ्याच शरिरामध्ये
दुभंगुन पडते.

स्पर्श चैतन्य वाहुन जातात.
मी तुझी इंद्रिय साठवुन ठेवतो,
पुढच्या दुष्काळासाठी.
शेवटी,
एकेक कागदी होडी असते,
निर्वासित मांडीसाठी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही काहीशी थेट वाटली

जरा पाल्हाळत जाते असेही वाटले ..........वै म क्षमस्व
पण आवडलीच हे वेगळे सांगणे न लगे Happy

आवडली.