"भुईपण"

Submitted by अमेय२८०८०७ on 9 March, 2013 - 02:24

ये रे सख्या अविनाशा
मला लाटेने भिजव
नाकारले स्वप्न माझे
ओल्या कुशीत उजव

उरी तापलेली वाळू
तुझे धृवांचे किनारे
वारा भणाणून वाहे
त्याच्या स्पर्शाचे शहारे

विसावून जाण्यासाठी
माझे जागतात काठ
भेगाळल्या खडकांची
नात्यांसम वहिवाट

ठाव नाही तुला ठावे
तुझी गूढता अमाप
कोसळण्याच्या हाकेला
खाऱ्या आसवांचा शाप

उडे चिमणा चिमणी
गोजिरासा परिवार
माझा बेभरवशाचा
भुईपणाचा संसार

DSC01822.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अख्खी कविता आमाप आवडली

फक्त हे समजले नाही ................. सांगाल का...............

<<<<कोसळण्याच्या हाकेला
खाऱ्या आसवांचा शाप>>>>