सारे असून सुद्धा

Submitted by -शाम on 8 March, 2013 - 01:30

वारा खाउन सुद्धा जगलो
इतके होवुन सुद्धा जगलो

भीक न मागू शकलो तेंव्हा
स्वप्ने चावुन सुद्धा जगलो

काजळले आयुष्य ज्यामुळे
त्या डोळ्यांतुन सुध्दा जगलो

इतके केले प्रेम कुणावर
हृदयावाचुन सुद्धा जगलो

तुझ्या किनारी लाटेसम मी
हताश परतुन सुद्धा जगलो

दु:खे गरिबी भूक वंचना
सारे असून सुद्धा जगलो

हे बाहेरुन नकोस ठरवू
असाच आतुन सुद्धा जगलो

..........................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

इतके केले प्रेम कुणावर
हृदयावाचुन सुद्धा जगलो

हा शेर अधिक आवडला.

वारा खाउन सुद्धा जगलो
इतके होवुन सुद्धा जगलो

भीक न मागू शकलो तेंव्हा
स्वप्ने चावुन सुद्धा जगलो

हे दोन शेर फार आवडले.
जमीन छान आहे.

वारा खाणे,
स्वप्ने चावणे<<<<<<
वा! वा!
अभिनव प्रत्ययकारी भाषा!
अलौकिक काफिये!
उस्फूर्ततेचा महापूर<<<

Rofl Rofl

धन्यवाद वैभव, विक्रांत, बेफि,

आणि मा.बो.वरून हकलूनही परत आलेले प्रा. भूशास्त्र व खानिज तेल.

रच्याकने, एखाद्या गझलेला नाहीच पर्यायी सुचली तर झाडाचे इतके हाल करून घेऊ नये. बरंका येडपटा?

आशा आहे यापुढे आपण माझ्या गझलेखाली शाई खर्ची घालणार नाहीत..

तसं शाईला पर्यायी शब्दही सुचलाय पण तो पुढच्या अभिप्रायासाठी ...

धन्यवाद!

प्रोफेसर साहेब,

प्रशासकांनी हरकत घेतल्यानंतरही आपण असे करत राहिलात तर आय पी अ‍ॅड्रेस ब्लॉक होईल हो? एक सन्मित्र म्हणून सांगण्याचे काम केले मी, ही काही धमकी वगैरे नव्हे वा माझा अधिकारही नव्हे. बघा पटले तर. बाकी जेथे तुमचे प्रतिसाद निव्वळ साहित्यीक वादांपुरते असतात तेथे मी हसून त्यातील गांभीर्य व तीव्रता जाईल याचा माझ्या परीने प्रयत्न करतोच Happy

प्रा. भूशास्त्र व खानिज तेल, अहो भांडण कसलं? उलट तुमच्यासारख्या वडिलधार्‍या माणसास अपशब्द वापरावे लागत आहेत हेच दुर्दैव माणतो मी.

तुम्ही वर लिहले तसे मी ही लिहू शकतो .. पण उपयोग काय??

एक सांगू , मा.बो वर.. उल्हास भिडे, प्रमोद देव, विनोद गोळे यांसारखी आपल्याच वयाची पण सगळ्यांशी हसून खेळून असणारी माणसे एकीकडे आणि दुसरीकडे आपण, नकोसे शब्दबंबाळ आणि कुत्सीत टिप्पण्या त्यात भर म्हणून रद्दड अशा बोळक्या स्मायली..?.

खालील प्रतिसाद वाचा... हा मी आत्मप्रौढीसाठी देत नसून.. माझ्या दुप्पट वयाचा कवी ( आपल्या पेक्षाही जास्त वय असेल त्यांचं) वयाची किंवा अनुभवाची प्रौढी सोडून किती विनम्र वावरत होता इथे .. हे पहा.
त्यांची निवर्तल्याची बातमी समजली तेंव्हा आपोआप डोळे भरून आले...

==================================================
pradyumnasantu
4 March, 2012 - 00:32
शामः आपण नेहमीच सकारात्मक सहकार्य देता. आभारी आहे. आपल्या प्रतिसादांमुळे उत्तेजन मिळते तसे चुकाही समजतात. सुधारणा करता येते.

==================================================

आपणच विचार करा, काय फक्त या स्मायलींसारखं हसू करून जाणार आहात?

शाम, गझल चांगली आहे. खूपच सूट घेतल्याचंही खटकतयच.
बाकी...
खळांची व्यंकटी सांडो... इतकंच म्हणू शकतो आपण. प्रार्थना "त्यांच्या" कडे करण्यात अर्थं नाही. प्रार्थना "त्या"च्याकडे करायची. आणि त्यातून आपले जे भोग आहेत ते तर आहेतच...
तेव्हा जो जे वांछील तो ते लाहो... म्हणायचं आणि गप्पं बसायचं.

तुझ्या किनारी लाटेसम मी
हताश परतुन सुद्धा जगलो

हा शेर आवडला.
बाकी विशेष आवडले नाहीत. (क्षमस्व.)

तुमचा शेवटचा प्रतिसाद अतिशय सुंदर आहे. लक्षात ठेवावा असा.

धन्यवाद.