एकदा थेंबा मनातच..

Submitted by रसप on 7 March, 2013 - 23:09

एकदा थेंबा मनातच तू स्वत:ला पाझरव
साचल्या निद्रिस्त डोही तू तरंगांना उठव

हासते जे नेहमी ते फूल असते कागदी
दु:ख होता हासणारे फूल हो, अश्रू फुलव

मी किनारा सागराचा, तू नदीचा काठ हो
दगड वाळू जमवली मी, तू जरा हिरवळ सजव

जे नसे माझ्याकडे ते पाहिजे असते तुला
समज थोडीशी प्रपंचा तू स्वत:लाही शिकव

ये तुझे मंदीर बांधू आजवर नव्हते असे
तूच मूर्ती, तूच भिंती, तू पुजारी, तू गुरव

'काल' गेला ज्या दिशेने 'आज'ही जातो तिथे
पण उद्याची पाउले 'जीतू' हवी तिकडे वळव

....रसप....
७ मार्च २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/03/blog-post_8.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गझल.

खयाल दिलचस्प वाटले.

जे नसे माझ्याकडे ते पाहिजे असते तुला
समज थोडीशी प्रपंचा तू स्वत:लाही शिकव

हा शेर जास्त आवडला. विशेषकरून त्यातले अदृश्य गांभीर्य फार भावले.

मी किनारा सागराचा, तू नदीचा काठ हो
दगड वाळू जमवली मी, तू जरा हिरवळ सजव

'काल' गेला ज्या दिशेने 'आज'ही जातो तिथे
पण उद्याची पाउले 'जीतू' हवी तिकडे वळव<<<

शेर आवडले.

जे नसे माझ्याकडे ते पाहिजे असते तुला
समज थोडीशी प्रपंचा तू स्वत:लाही शिकव<<<

यावरून माझा एक जुना शेर आठवला.

स्वतःकडे नसेल तेच वाटते हवे हवे
मला प्रवाह पाहिजे, तुलाच तीर पाहिजे

ये तुझे मंदीर बांधू आजवर नव्हते असे
तूच मूर्ती, तूच भिंती, तू पुजारी, तू गुरव
>> दुसर्‍या ओळीतली सहजता आवडली...

जे नसे माझ्याकडे ते पाहिजे असते तुला
>> सहज... Happy

मस्त गझल रे जितू खूपच आवडली
दिलचस्प खयाल>>>> कणखरजी +१

तू पुजारी तू गुरव>>> ही द्विरुक्ती वाटली मलातरी.....म्हणून "बदलाची गरज" सुचवतो आहे Happy

सर्वांगसुंदर.....

'काल' गेला ज्या दिशेने 'आज'ही जातो तिथे
पण उद्याची पाउले 'जीतू' हवी तिकडे वळव >>>> हे विशेष आवडले...

धन्यवाद !!

____/\____

----------------------------------------

'दिलचस्प' !! - व्वाह !! हा शब्दच वापरल्याबद्दल विशेष आभार, कणखरजी !! Happy

एकदा थेंबा मनातच तू स्वत:ला पाझरव
साचल्या निद्रिस्त डोही तू तरंगांना उठव
खूप वेगळी कल्पना, तिचा तजेला अख्ख्या गझलेत झिरपलाय.

मस्त गझल Happy

ओ ते विचित्र स्मायली रसभंग करतात आणि तुमच्या प्रतिसादांचं गांभिर्य(?) पुर्ण घालवतात. पटलं तर घ्या नाहीतर अनुल्लेख करा.