स्पर्श

Submitted by चाऊ on 19 October, 2008 - 08:50

निरागस, स्नेहमय, बालकाचा स्पर्श
मायेने ओथंबलेला, मातेचा स्पर्श
प्रेमळ, कणखर, धीर देणारा, पित्याचा स्पर्श
वेदना जागवणारा, स्वप्नांचा स्पर्श

निर्विकार, थंड, अटळ स्पर्श
गर्दितील,गलीच्छ, अमंगळ स्पर्श
खोट्या स्नेहाचा, संधीसाधू स्पर्श
दूरुनही विटळणारा आधाशी नजरेचा स्पर्श

सागराच्या सा़क्षीने, हातांचा स्पर्श
सर्वासमवेत असताना, चोरटा मोहक स्पर्श
आर्द आसवांसवे, दुखावलेला, व्याकुळ स्पर्श
क्षणात जिंकणारा, निखळ मॆत्रीचा स्पर्श !

गुलमोहर: 

"स्पर्षाची भाषा मुळी,
शब्दांना कळत नाही,
म्हणुनच स्पर्षाची तिव्रता
शब्दांत असत नाही ."

छानच आहे, कविता.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

तुझं नाव अनिरुद्ध? मला वाटलं ही कविता एखाद्या स्त्रिची असेल! कविता वाचल्यानंतर तुझी व्यक्तिरेखा पाहिली. संपुर्ण कविता स्त्रिची वेदना आहे, व्यक्त आहे पण...
निर्विकार, थंड, अटळ स्पर्श
गर्दितील,गलीच्छ, अमंगळ स्पर्श
खोट्या स्नेहाचा, संधीसाधू स्पर्श
दूरुनही विटळणारा आधाशी नजरेचा स्पर्श
ह्या ओळीत मी फिदा.....

आजुबाजुला आपण जे बघतो, अनुभवतो, तेच आपल्या लिखाणात येतं ना?
आणि आपल्यासारख्या संवेदनाशील कलाकाराला हाच, शाप की वर आहे, दुसर्‍याच दु:ख, आणि सुखही उत्कटपणे जाणवण्याचा..
कधी कधी फार ताप होतो, पण मग असं लीखाणातुन बाहेर पडलं की मोकळं वाटतं.
असो!
फारच मोठी दाद दिली आहेस, धन्यवाद.

चाऊ, स्पर्शून गेलास बघ.