दोन कविता

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 6 March, 2013 - 16:22

१) विराम

भर दुपारी
भुक लेऊन,
अस्ताव्यस्त
केसांनी,
धुरकटलेला
जीव घेऊन,
भारावलेले
क्षण चाळवीत,
तुझ्या दाराशी
छिनालपणे,
उभा जन्म
कोसळण्याची
वाट पाहत?

२) गुडलक कॅफे

मी,
ती,
कॉफी,
सिगरेट्स
आणि
गुडलकच्या
गल्ल्यामागच्या
फोटोतून,
मोनालिसा सारखं
हसणारा पारशीबाबा.
इतकं पुरेसं
नाहीये का?
तंद्रीचे,
अभंग श्वास घ्यायला?
स्वत:चा
निरोप घेऊन,
इथेच मी
डोळे मिटतोय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच तुमची souls at 2 pm ही कविता वाचली. खूप छान अभिव्यक्ती वाटली.
त्या तुलनेत या दोन्ही कवितांचा इफेक्ट छान वाटला तरी अ‍ॅब्स्ट्रॅक्टच्या नादात जाणिवपूर्वक निर्माण केलेला विस्कळीतपणा दोन्ही कवितेत आहे. तरीही समजून घ्यायला अवघड नाही याबद्दल आभार.