जीवनाचा अर्थ

Submitted by विजय जोशी on 6 March, 2013 - 11:13

।। जीवनाचा अर्थ ।।
-------------------------

सुखाच्या मागे जावून आपण दुख्खाना आमंत्रण देत असतो !
सुख-समाधान हे मानण्यावर असतं, कारण त्याला कधीच अन्त नसतो !
सुख हे वाळवंटातील मृगजाळासारख असतं, ते जवळ येवूनही लांब राहतं !
पण दुख्खाशिवाय सुखाला किमत नसते, हे नकळत आपण विसरतो !
सुख आणि दुख्खाचा समजून घे तू अर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ ।। १ ।।

घेताना नेहमीच हात असतात तुझे पुढे, थोडं द्यायलाही शिक ।
घेण्याबरोबरच देण्यातही आनंद असतो, जीवनाचा आनंद घ्यायलाही शिक ।
अन्नदान, अर्थदान, रक्तदान, श्रमदान यांना जीवनात खूप मोल आहे ।
काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं, हा इथला नियम आहे ।
दिलं तरच घेण्याला अर्थ आहे, नाहीतर जीवन आहे व्यर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ ।। २ ।।

काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, या षडरिपुंपासून तू सावध राहा ।
आयुष्य हे क्षणभंगुर असतं, त्याचा सदुपयोग करून पहा ।
चांगल्या कामाला नेहमीच पाठींबा दे, त्यात अडथळा आणू नको ।
कुणाला प्रोत्साहित करता येत नसेल, तर निदान नाउमेद तरी करू नको ।
दुसऱ्यासाठी जगण याचा समजून घे तू अर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ ।। ३ ।।

मान्य आहे "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार", पण देवावरील श्रद्धा सोडू नकोस ।
कारण जेव्हा सर्व उपाय संपतात, तेव्हा तोच तुझा आधार असतो, हे मात्र विसरू नकोस ।
बायबल वाचतो, कुराण वाचतो, वाचतो महाभारत, बैठकीला जातो, कीर्तन ऐकतो, तुळशीची माळही जपतो ।
सर्वाचं साध्य एकच असतं, मात्र तिथे जाण्याचा मार्ग वेगळा असतो ।
नामस्मराणाचा समजून घे तू अर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ ।। ४ ।।

विचार आणि मन स्वच्छ ठेव, स्वतःबरोबरच दुसऱ्यालाही जगू दे ।
जात, धर्म, भाषा याहीपलीकडे जीवन आहे, हे तुझ्या मनात असू दे ।
दुसऱ्याकडे जेव्हा तू बोट दाखवतोस, तेव्हा उरलेली बोटं तुझ्याकडे वळतात ।
पाप-पुण्याचा हिशोब देवाकडे असतो, त्याची प्रायश्चित्त इथेच तुला भोगायची असतात ।
पाप आणि पुण्य याचा समजून घे तू अर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ ।। ५ ।।

लक्षात असू दे, आई-बाबा, बायको-मुलं याही पलीकडे संसार आहे ।
डबक्यातल्या बेडका सारखा राहू नकोस, बाहेर पड, जग खूप मोठ आहे ।
परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, बदलत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं ।
आनंदात सर्वच सहभागी होतात, दुख्खात साथ देणं महत्वाच असतं ।
संसाराचा समजून घे तू अर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ ।। ६ ।।

जगामध्ये शाश्वत काहीच नाही, सर्वकाही नश्वर आहे ।
तू आलास एकटाच आणि जाणारही एकटाच आहे ।
शब्दांपेक्षा कवितेतल्या माझ्या भावनांचा समजून घे तू अर्थ ।
तरच माझी कविता ठरेल सार्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ, नाहीतर जीवन आहे व्यर्थ ।। ७ ।।

--------------------------------------------------------------------------------------------------------
विजय म. जोशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निबंध फार फार आवडला.

सत्संगाला बसल्यासारखे वाटले.

तुमची कळकळ समजली .श्री.वामनराव पै यांच्या शिकवणीचा हे सार आहे का ? हे धार्मिक आणि तत्वज्ञान मध्ये टाकल असते तरी चालले असते .