हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना -

Submitted by विदेश on 5 March, 2013 - 11:47

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना
एकास आवडे जे दुसऱ्यास का पटेना

स्पर्धेत जीवनाच्या का ताळमेळ नाही
कुठलाच मनपतंग कटता कसा कटेना

उपदेश कायद्याचा करण्यात गुंततो जो
सुधरावयास तोरा अपुलाच का झटेना

भिक्कार आहे म्हणुनी धिक्कारतो कुणी तो
किति छान आहे म्हणुनी हा दूर का हटेना

माझ्याचसारखा मी समजे कुणी स्वत:ला
गर्वात आत्मस्तुतिचा फुगता फुगा फुटेना
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक प्रतिसादक | 6 March, 2013 - 11:34>>>>+१

सरांनी पर्यायीगझल दिलीच आहे
http://www.maayboli.com/node/41658

टीप : सर =एक अनामिक गझलवेडा= पूर्वाश्रमीचे प्रा. सतीश देवपूरकर = देवसर