मोजपट्टी

Submitted by -शाम on 4 March, 2013 - 23:21

एक मोजपट्टी दिसतेय हल्ली
मला...माझ्याच डोळ्यात
कधी लांबी कधी रुंदी
कधी खोली, उंची

माझ्याही नकळत मोजलं जातंय
संकोच, विस्तार, दिशा, अंतर
... सगळंच
समोर येणार्‍या प्रत्येकाचं
आणि
होत रहाते आकडेमोड, तुलनाही
उत्तरांची

मनातल्या मनात
तुझेसुद्धा
आकार उकार मोजून झालेत
उंची, खोली, सगळ्याचेच
निष्कर्षही योजून झालेत

आश्चर्यच ना?

खरं सागू..
मोजपट्टी प्रत्येकातच असते
सांगायची छाती नसते

इतकंच....
................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोजपट्टी प्रत्येकाला असते
सांगायची छाती नसते

इतकंच.... >>>>>> वा बहोत बढिया .......

- पण काय करणार ? शेवटी - "न ब्रूयात सत्यम् अप्रियम् | " - हेच जास्त प्रॅक्टिकल ना !!

छानच.

(काही वेळा काही काही विचार प्रकटनांना नेमके कविता या प्रकारात का गणायचे असा प्रश्न पडतो. मला वाटते - अर्थात तसा काहीही अधिकार नाहीच, पण - की एक मुक्तचिंतन नावाचा प्रकार काढावा, ज्यात अश्या हटके कल्पना, खयाल, ज्या ब्रीफली मांडल्या जातात आणि टचिंग असतात, त्या समाविष्ट करता याव्यात) अधिक उणे बोललो असल्यास क्षमस्व!

-'बेफिकीर'!

मला आवडली

____________________

बागेश्रीची आठवण आली रचनेच्या स्टाईल वरून (सहजच सांगत आहे कृगैन )
Happy