SOULS AT 2 PM

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 4 March, 2013 - 14:42

सेन्योरा एक्स,
तेवत ठेव उघडा दिवा
इंद्रियांचा गुंता घेऊन,
सडत चाललेल्या देहाला
पाहशील आरसे लावुन,
तेव्हा फुलपाखरांचे थवे
जातील रेडलाईट मधुन.

हे एंटोनिओ,
तुला तुझा स्पर्श तुझाच असतो
माझा तुला स्पर्शही तुझाच असतो
मग क्षणोक्षणी भंगणारं
तुझं शरीर
कधी जगता येईल का मला?
असा सल ठेऊन ,
मी माझ्या आत लपवलाय
फुलपाखरांचा थवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुलपाखरांचे थवे ही प्रतिमा स्वच्छंदी विचार / रंगीबेरंगी स्वप्नांसाठी आहे का ?
कुठल्याश्या वेश्येचा सल ..प्रभावी मांडणी आहे.

होय, मुद्दाम स्पॅनिश पात्रं घेतली आहेत. मला या कवितेची पार्श्वभुमी १९४० च्या सुमारची आणि पॅरिस/बार्सिलोनामधल्या अवांत गार्द चळवळीला साक्षीदार असणार्‍या पिढीची हवी होती. त्याचं कारण म्हणजे Existentialism कलेत चितारणारी आणि समजुन घेणारी ही नवीन तरुण पिढी होती.
सेन्योरा एक्स हे पात्र काहीसे गुस्ताव फ्लोबर्टच्या मादाम बोवारी (माया मेमसाब) सारखे आहे. त्यामुळे तिचा प्रियकर एंटोनिओला ती कन्फ्युस्ड वाटते. त्यामुळे तो स्वतः कन्फ्युस्ड आहे, तिच्या लैंगिक फॅन्टसीजचा गुंता तो सोड्वु पहातोय.तो लिबरल असला तरी त्याचा आवाका लहान आहे. तो तिला समजावु पहातोय की, आपल्या शारिरीक आणि भावनिक जाणिवांना आरसे लावुन स्वतःच पहा. कदाचित तुला काहीच सापडणार नाही.
यावर ती म्हणतेय की, आपण सगळे नेहमी जन्मापासुन एकटेच असतो. तुझा स्वतःला स्पर्श किंवा मला तुझा स्पर्श या दोन्हींचिही जाणिव केवळ तुझीच आहे. मी केवळ साधन आहे आणि तसेच माझ्यासाठी तु किंवा अन्य पुरुष. आपण एकमेकांची शरीरं भोगु शकतो पण जगु शकत नाही. आपल्या शारिरिक किंवा भावनिक जाणिवा आपलयापासुन सुरु होतात आणि आपल्यातच संपतात. त्यामुळे माझं आत लपवलेलं स्वच्छंदी प्रेम केवळ माझं, माझ्यासाठी आणि माझ्यावरच आहे. इतरांसारखाच तु केवळ एक साधन आहेस.

पार्श्वभूमी वाचल्यावर (थोडेफार गूगलबाबाची मदत घेतल्यावर) कविता अजून आवडली. पण या कवितेचे शीर्षक इंग्रजीमधून का आहे?

@नंदिनी
काही विशेष विचार करुन मी शिर्षक इंग्रजीतुन लिहिलेले नाही. असंच लिहिलंय. Happy

धन्यवाद उलगड्याबद्दल. कविता अधिक भावली.तिच्यातल्या संवादाला असाही एक कालातीत नाद आहे.
रच्याकने,गुस्ताव फ्लॉबेर (असाही एक उच्चार आहे ) स्पॅनिश होता का ?(आत्ता गूगलून पाहिले,फ्रेंच होता ). असो. स्पॅनिश भाषा व साहित्यकार खूप समृद्ध असल्याचे जाणवते.