''आजचे टळले उद्यावरती मरण''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 March, 2013 - 10:59

काय कुठल्या पावलावरती मरण
कोरले आहे कशावरती मरण

कोरभर तुकडा मुखी पडला जसा
आजचे टळले उद्यावरती मरण

एरवी जीवन जिच्यावर धावते
त्याच गाडीच्या रुळावरती मरण

पाहिले खोटे,क्षणी आनंदलो
नोंदलेले कागदावरती मरण

सोड तू ''कैलास'' चिंता जीवनी
जीव ओवाळी तुझ्यावरती मरण

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला तुलनेने कमी आवड्ला

बाकी एकनेक शेर "खल्लास" !!!!!!
सगळे आवडले

______/\_______

जीव ओवाळी तुझ्यावरती मरण>>>> हा शेर तुम्हाला अजरामर करणार बघा !!!!!
________________________________________
अवांतर : लोक तुम्हाला "खल्लास" गायकवाड का म्हणतात ते समजले ;)(गम्मत करतोय)

वाह वाह !
मरणासही जिवंत करणारी गझल !
खूप आवडली .

मतल्याबाबत वैवकु यांच्याशी सहमत .

अप्रतिम गझल डॉक्टर साहेब...

कोरभर तुकडा मुखी पडला जसा
आजचे टळले उद्यावरती मरण

एरवी जीवन जिच्यावर धावते
त्याच गाडीच्या रुळावरती मरण

सोड तू ''कैलास'' चिंता जीवनी
जीव ओवाळी तुझ्यावरती मरण

वरील ३ शेर तर एकदम कातिल...

शुभेच्छा.

कोरभर तुकडा मुखी पडला जसा
आजचे टळले उद्यावरती मरण

एरवी जीवन जिच्यावर धावते
त्याच गाडीच्या रुळावरती मरण

सोड तू ''कैलास'' चिंता जीवनी
जीव ओवाळी तुझ्यावरती मरण

व्वा! हे शेर आवडले. छानच गझल Happy

सोड तू ''कैलास'' चिंता जीवनी
जीव ओवाळी तुझ्यावरती मरण >>>>>> जबरी, जबरी....

संपूर्ण गजल - जियो, जियो डॉक.......

कोरभर तुकडा मुखी पडला जसा
आजचे टळले उद्यावरती मरण

एरवी जीवन जिच्यावर धावते
त्याच गाडीच्या रुळावरती मरण<<< चांगले सुंदर शेर. फार आवडला स्पेशली रुळावरतीवाला.

सोड तू ''कैलास'' चिंता जीवनी
जीव ओवाळी तुझ्यावरती मरण<<< दुसरी ओळ फार मस्त

एरवी जीवन जिच्यावर धावते
त्याच गाडीच्या रुळावरती मरण

मस्त शेर.
जमीन फार आवडली.

कोरभर तुकडा मुखी पडला जसा
आजचे टळले उद्यावरती मरण

एरवी जीवन जिच्यावर धावते
त्याच गाडीच्या रुळावरती मरण

सोड तू ''कैलास'' चिंता जीवनी
जीव ओवाळी तुझ्यावरती मरण classssssssssic

अप्रतिम गझल डॉक !

कालच फेअस्बुकात वाचली होती !!

सोड तू ''कैलास'' चिंता जीवनी
जीव ओवाळी तुझ्यावरती मरण

हा शेर अप्रतिम !!

---
आपला विनम्र
प्रसादपंत

गिरीजा | 6 March, 2013 - 05:31
.अप्रतिम गझल डॉक !.........................................
...................................................हा शेर अप्रतिम !!
---
आपला विनम्र
प्रसादपंत>>>>>>>>>>>>>>

Uhoh

क्या बात है डॉक!! यू रॉक!!!

कोरभर तुकडा मुखी पडला जसा
आजचे टळले उद्यावरती मरण

सोड तू ''कैलास'' चिंता जीवनी
जीव ओवाळी तुझ्यावरती मरण

कातिल!!

जबरी !!

एरवी जीवन जिच्यावर धावते
त्याच गाडीच्या रुळावरती मरण

भन्नाट निव्वळ !