।।माझी शाळा।।

Submitted by राजीव मासरूळकर on 3 March, 2013 - 08:30

।।माझी शाळा।।

माझी शाळा माझी शाळा
मज आवडते माझी शाळा ।।धृ।।

छोटुकल्यांना लळा लाविते
धाटुकल्यांचा मळा फुलवते
अज्ञानाच्या झळा पळविते
झुळझुळते निर्मळा।।१।।

फुलामुलांच्या गोष्टींमधुनी
प्राणी पक्षी सृष्टीमधुनी
गुरूजनांच्या दृष्टीमधुनी
दिसती जीवनकळा।।२।।

सुंदर सवयी अंगी बाणवी
पशूस जगणे देई मानवी
नष्ट कराया वृत्ती दानवी
झिजते ही प्रेमळा।।३।।

गाव राज्य अन् देशासाठी
विश्वाच्या समृद्धीसाठी
प्रेम दया मानवतेसाठी
स्फुर्ती दे तिळतिळा।।४।।

- राजीव मासरूळकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैवकु,
हार्दिक आभार !
मान्य आहे. राग नाहीच. बालकांच्या भावना त्यातून निरागसतेने व्यक्त झालेल्या नाहीत . पोक्त भाव आहेत . बालगीत नाही वाटत पण बालकांसाठी ते नक्कीच चांगलं आहे , यात शंका नसावी !

भारती बिर्जे,
(आणि विक्रांतजी)
कुमार गीत किंवा किशोर गीत म्हणूया !
चालेल ना ?
Happy
हार्दिक आभार !