जलसूक्त

Submitted by अमेय२८०८०७ on 2 March, 2013 - 01:55

तन टिपूनी - क्षण निघूनी गेला तेव्हा..
अश्रू सरले डोळे नुरले
सरणावरती - मरणानंतर
माझ्यातून किती मी विलगले

उणीव नाही - जाणिव नाही
गतजन्म होऊनी उरली मागे
स्थितिस्थापक - दृष्टी व्यापक
निसर्ग झालो सृष्टीसंगे

रानातून - पानातून हललो
हालविणारा वारा झालो
सुसाट जेव्हा - पिसाट तेव्हा
वीज वाहूनी नभी चमकलो

भीती नाही - प्रीती नाही
आसक्तीही उरली नाही
मी बिंब - प्रतिबिंब मी
मी विश्वाचा प्रकाशवाही

नश्वर ते - इश्वर हे
पंचत्वी अभिषिक्त मी
धरा बोलवी - जरा सादवी
कोसळते जलसूक्त मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भीती नाही - प्रीती नाही
आसक्तीही उरली नाही
मी बिंब - प्रतिबिंब मी
मी विश्वाचा प्रकाशवाही
नश्वर ते - इश्वर हे
पंचत्वी अभिषिक्त मी
धरा बोलवी - जरा सादवी
कोसळते जलसूक्त मी

सुंदर. आवडली