हट्ट

Submitted by अनिल आठलेकर on 1 March, 2013 - 12:26

हट्ट हा सुटणार नाही
पापणी मिटणार नाही...

वादळा माघार तू घे!
आज मी हटणार नाही...

वेदनांचा कुंभमेळा
सारखा भरणार नाही......

कालचा तो भास होता
आज मी फसणार नाही...

आंधळा दरबार आता
आणखी तरणार नाही...

यापुढे 'नारायणाला'
वावगे खपणार नाही...........!!!

-©अनिल आठलेकर, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील गझलेत नंतर मतल्यात बदल केला होता.
चुकून जुनीच रचना पोस्ट झाली....

मतला खालीलप्रमाणे....

हट्ट हा सरणार नाही
पापणी मिटणार नाही....

वाह ! क्या बात है !
सुंदर गझल . खूप आवडली .

(आठलेकर सर,
आधीचा मतलाही चांगलाच आहे. पण गझलतंत्र आडवे येते. इथे आपण आपली पोस्ट संपादित करू शकतो. शिर्षकाखालील संपादन या शब्दावर क्लिक करून दुरूस्ती करून घ्यावी.)

आधीचा मतलाही चांगलाच आहे. पण गझलतंत्र आडवे येते...........

>>>>>>>>>
मासरूळकर.............

माझ्या मते बदल असवश्यकता नाही !!!!!!!!

१)अ ,इ ,उ अशी हलकीशी सूट फक्त या तीनच स्वरांबाबत घेतली तर चालते असे मी ऐकले आहे

२)अशी सूट येणार असेल तर तसे शायराने मतल्यातच स्पष्ट करायला हवे असेही मत जाणकारांकडून ऐकले आहे तसे जर केले गेले नसेल व एखाद्या शेरात अशी सूट शायराने घेतलीच असेल आणि जर शेर छान होत असेल तर त्याही बाबीकडे दुर्लक्ष केले जाते असेही मी पाहिले आहे

३) इथे मतल्यात पहिल्या ओळीत उ..... दुसरीत इ ही अलामत...... व नंतर प्रत्येक शेरात अ ही अलामत ग्राह्य सूट मानली जाते

४)आता पुढील प्रत्येक शेरात अश्या स्वरूपातील अलामत अदलून -बदलून यावी .... .....किंवा सेमच यावी अश्यासाठी कोणतेही मत ..मतप्रवाह .....नियम माझ्या माहीतीप्रमाणे नाही आहे ते कसेही केले तरी चालते

असो
फार विचार नका करू इतकेच म्हणायचे आहे
~वैवकु
Happy

टीपः
१)फक्त या तीनच स्वरांबाबत
२) माझे मत /माझी माहीती इत्यादी चुकीचे आहे असे आढळल्यास क्षमस्व
....अश्यावेळी निदर्शनास आणून दिल्यास आभारी राहीन

Dhanyawad Mitraho. .

Rajiv,
Thoda vel lagel asa watatay maybolivar saravayla. I am still finding it difficult to type here.

Vaibhavji,

Ajun mi shikat ahe. Tyamule tumha sarvanchya madatine shikaycha praytn ahe.

Ajun mi shikat ahe. Tyamule tumha sarvanchya madatine shikaycha praytn ahe.>>>>

मी ही शिकतोच आहे की मग .............................
आणि अनिलजी अहो इथे मी पाहिले आहे की अनेक शिकलेल्या इतकेच काय काही शिकवणार्‍यानाही इतके छान लिहिता येत नाही...... तुम्ही खूप छान लिहिताय ....पाहतोय ना मी .....मला आवडतेही फार तुमचे लिखाण

Happy

वैवकु,
खुद्द शायरानेच बदल करायची इच्छा व्यक्त केली होती प्रतिसादात. ते इथे नवीन असल्याने मी केवळ संपादनात मदत करण्यासाठी तो कंस लिहिला. नंतर तो संपादित करणार होतो. आपण दिलेली बरीचशी माहिती होती माझ्याकडेही.

बाय द वे,
वैवकु ,
मला वाटलं , माझाच घोळ आहे. तुमच्याही मनात गोंधळ दिसला (किंवा आता झाला) अलामती बाबत.

बघा,
सुटणार,(सरणार)
मिटणार,
हटणार,
भरणार,
फसणार,
खपणार ,
या कवाफींमध्ये अलामत कोणत्या अक्षरांवरून ठरते ?
सु व मि वरून ठरते काय ? तसे असले तर प्रत्येक काफियामध्ये अलामतीनंतर"टणार" आलेच पाहिजे ना ?
Happy

शायराने बदल करायचा ठरवला तो योग्यच नव्हे काय ?

आपण वर दिलेली माहिती क्र ३ मात्र माझ्या माहितीप्रमाणे बरीचशी बरोबर आहे .

"टणार">>>>

अरेच्च्या होय की ......!!

असो तेवढ्यातल्यातेवढ्यात मला माझे अगाध ज्ञान पाजळायला मिळाले या सुवर्णसंधीबद्दल मी आपला आभारी आहे मासरूळ्कर

Happy

वैवकु,
माझे मत समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. काही चुकले असल्यास क्षमस्व.