खंत

Submitted by अनिल आठलेकर on 27 February, 2013 - 13:04

खंत

हृदयास रोज माझ्या
खंत फार वाटे...
स्वजनी पेरलेले
बोचतात काटे.....

झाले इथे किती हे
अपराध दानवांचे
तरीही सजेस दोषी
उपकार मानवाचे........

या क्षुद्र जीवनाचा
दोष कोणता तो
दुखावल्या मनाला
मारी लाथ जो तो...........

होते जरी मुखाशी
तृष्णा कधी न शमली.....
जयही नसे नशिबी
तडजोडही न जमली........

आशा तरी उराशी
भोळी असे सुखाची........
आता मनी न वाटे
भीती बुळ्या विषाची......!!

__अनिल आठलेकर, पुणे
२७ फेब्रुवारी २०१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल जी मायबोलीवर तुम्हाला पाहून खूप आनंद झाला

काव्य आवडलेच नेहमीप्रमाणे

हेच काव्य याच शीर्शकाने पुन्हा प्रकाशित करायची गरज नसते इथे जसजसे प्रतिसाद येत जातील तसतसे ते आपोआप वरच्या पानावर नवीन लेखनात दिसते तुमच्या सदस्यत्वात माझे लेखन मधेही दिसते कविता विभागात मागील मागील पानावरही ते राहतेचच

असो खूप खूप शुभेच्छा
~वैवकु Happy

धन्यवाद वैभव जी..
अजून मायबोलीवर कसे लिहायचे याबद्दल अनुभव नाही. त्यामुळे मार्गदर्शन करावे. असाच लोभ आणि लक्ष राहूदे.
Happy