दुःख नाही 'ती' शपथ (संकेत तरही एक प्रयत्न)

Submitted by उमेश वैद्य on 25 February, 2013 - 11:03

दुःख नाही 'ती' शपथ तू पाळणार नाही
साथ माझीही मजसवे चालणार नाही

रुंद झाला रस्ता, देउळ ही नाही तिथे
हात माझे जोडण्याचे सोडणार नाही

गुंगला तो क्षणभरच पाहून कपडे तुझे
खेळ सोडूनी तिथे तो गुंतणार नाही

निर्भयाच्या भयाने उसळला देश सारा
काळ काही त्या स्मृती सांभाळणार नाही

विखुरल्या नात्या साठी थोडा वेळ होता
आता तो दिला तरी ते सांधणार नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उमेशजी,
प्रांजळपणे वैयक्तिक मत देतोय, गैरसमज नसावा.
सदर रचना लिहिताना २ गोष्टींकडे दुर्लक्ष झालं असावं असं म्हणण्यास वाव आहे.
(१) संकेत तरहीत विषद केलेले तपशील जसे च्या तसे येता कामा नयेत.
(२) वृत्त हाताळणी.