श्रीराम!

Submitted by मुग्धमानसी on 25 February, 2013 - 06:17

तुझ्या मधाळ शब्दांनी नाही फसत श्रीराम
आजकाल आसवांनी नाही भिजत श्रीराम!

भरलेली झोळी पुन्हा पुन्हा पसरावी किती..
अशा भिकेला रे भिक नाही घालत श्रीराम!

भेट सगळ्यांची घ्यावी कुणा टाळण्याच्या पूर्वी
भेटायाला येण्याआधी नाही सांगत श्रीराम!

ताट नैवेद्य सजला तूप पुरणाची पोळी
भूक त्याची अनंताची नाही भागत श्रीराम!

करी कल्लोळ टाळांचा त्यांना ठाउकच नाही...
हल्ली तिथे गाभार्‍यात नाही वसत श्रीराम!

तुझ्या पुजा-भजनात सारे असे गढलेले
तुझे नाम उच्चारणे नाही जमत श्रीराम!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धमानसी, मी एका वाहत्या बाफवर खालील अभिप्राय लिहिला होता ह्या कवितेवच्या एका कडव्यावर. इथे तुम्हाला नको वाटल्यास उद्या उडवून टाकते Happy

---------
अश्विनी के | 25 February, 2013 - 22:57

मुग्धमानसीच्या 'श्रीराम' कवितेतल्या ह्या ओळी काय मस्त आहेत !

>>>भेट सगळ्यांची घ्यावी कुणा टाळण्याच्या पूर्वी
भेटायाला येण्याआधी नाही सांगत श्रीराम!>>>

शेवटचा दिस आणि क्षण कोणता असेल हे त्या श्रीरामाशिवाय कुणालाच माहित नाही. तो त्याला पाहिजे तेव्हाच येणार न्यायला कुणाच्याही नकळत. कुणाही आप्ताला (नातेवाईक नव्हे...जीवाला जीव देणारे ते आप्त), प्रेमळाला विनाकारण दुखवून टाळण्याऐवजी प्रेम द्यावे प्रेम घ्यावे आणि आपला खजिना भरभरुन ओसंडून जाऊ द्यावा आणि तोच बरोबर घेऊन जावा. श्रीरामाला तोच बरोबर न्यायला आवडतो कारण तो स्वतःच प्रेमस्वरुप आहे.
-------

सुं द र

धन्यवाद सर्वांनाच!

अश्विनी के: माझ्या ओळींचा तुमच्याकडून सन्मानच झालेला आहे. मी तुमचे आभार मागते. मला नको का वाटेल? मला त्या बाफ ची लिंक देणार का?

श्री: Proud

छान कविता ,
>>>भेट सगळ्यांची घ्यावी कुणा टाळण्याच्या पूर्वी
भेटायाला येण्याआधी नाही सांगत श्रीराम!>>>

नेमका याच ओळीवर बराच वेळ अडकलो होतो .धन्यवाद अश्विनी के .