दु:ख

Submitted by सुनिल जोग on 25 February, 2013 - 04:43

दु:ख

चार दिवस
पाहुणे म्हणुन दारी आले.. अवचित
जा कसे म्हणू ?

आलास न कळविता आणि
जोडीने मित्रांना पण... ?
अलगद ... मांजरीच्या पावलाने
द्चकलोच क्षणभर.. !

पण.. तू आल्यावर बरं वाटलं मित्रा
वाटलं जुना शाळ सोबती आला
खूप वर्षांनी
चेहर्‍यावर वयाचा, परिस्थिती चा राप
कुठेतरी खिन्न्ता.. पुर्वीसारखी
गळाभेट कमी होणारी,
पण नाकबूल करण्याचा कणखरपणाही
तसाच.. अगदी पुर्वीसारखाच

मनातल्या मनात हसलो त्याच्या या
वागण्यावर ...
मी सुखी माणसाचा सदरा घेतल्या पासुन
तसा दुरावलास च तू..
पण माझाही नाईलार होता रे
या जगात मजेत जगायचं असेल
तर...
असे सदरे, असे वेश, असे मुखवटे
घालावेच लागतात्, विकत नाहीतर भाड्याने घेउन
पण.. तू.. निश्चींत रहा
हे घर आपलंच आहे
मी काही तुला जा म्हणणार नाही
माझा यार आहेस दोस्ता
तुझ्या संगतीतील रात्री, वेदना,कळा
यांचा कैफ वेगळाच असतो मित्रा

पाहुण्रचाराला आलास पण घरचाच होऊन रहा
मस्त जेवू, गप्पा मारू
निघायचे तर एकत्रच निघू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users