माझ्या तुकोबाचे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 24 February, 2013 - 09:00

माझ्या तुकोबाचे l बोल करुणेचे
भरले दयेचे l कृष्णमेघ ll १ ll
शब्दो शब्दी असे l शुद्ध कळकळ l
व्हावेत सकळ l सुखी इथे ll २ ll
तिथे मुळी नाही l आड वा पडदा l
आरसा नागडा l मना दावी ll ३ ll
मुक्तीचे मौक्तिक l प्रत्येक शब्दात l
देई फुकटात l आल्या गेल्या ll ४ ll
परी जपूनिया l ठेवी हृदयात l
तोच भाग्यवंत l भक्त सखा ll ५ ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनोभावे निष्काम सेवा, झालो धन्य मी !
मागण्या काही न ऊरले, वंदीतो तूझला मी !

*** श्री. विक्रांत जी, आपला अभंग फारच छान आहे ******

मनोभावे निष्काम सेवा, झालो धन्य मी !
मागण्या काही न ऊरले, वंदीतो तूझला मी !

*** श्री. विक्रांत जी, आपला अभंग फारच छान आहे ******

गामा_पैलवानजी,शशांक ,अमेयजी,राजीवजी,विजयजी,श्याम ,वैभव,,सर्वांना धन्यवाद .