माझेच पंख मजला... (संकेत तरही)

Submitted by प्राजु on 24 February, 2013 - 01:17

ना शल्य आज याचे, आभाळ ना बरसले
माझेच पंख मजला, पसरावया न जमले

झाली सवय कधीची, पायांत जोखडांची
स्वातंत्र्य त्या बिचार्‍या, हत्तीस ना उमगले

पाहून राजहंसा, क्षण मात्र लोभ झाला
पण मन पुन्हा बकाचे, लावून ध्यान बसले

मी मोडता रुढींना, कर्मठ कितीक उठले
केला विरोध आधी, आता हळूच नमले

जेव्हा बघाय गेले उबदार गाव माझा
वाडे जुने न दिसले, दिसले मुजोर इमले

मैत्रीत विस्मृतींच्या मन आज हे स्मृतींनो!
सोडून साथ तुमची आहे अखेर रमले

ना धान्य ना मसाले, तो भूतकाळ सारा
जात्यामध्ये स्मृतींनी अश्रू अता भरडले

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. मतला बहुधा जमला असावा<<<

तू माझी साथ दिली नाहीस याचे दु:ख नाही, दु:ख हे आहे की मीही माझी साथ दिली नाही. या दृष्टीने पाहिल्यास 'आभाळ बरसणे' व 'पंख पसरणे' यांची सांगड (मला तरी) घालता येत नाही. आभाळ बरसण्याचा दुष्काळाशी संबंध असू शकतो आणि पंख पसरण्याचा 'आभाळाऐवजी पिंजर्‍यात अडकलेल्या पक्ष्याशी' संबंध असू शकतो.

२. मंदिराचा तुम्ही उल्लेख केला होता. मी अर्थ असा घेतला की, माणूस सवयीचा गुलाम असतो. त्यामुळे मंदीर तिथे नसलं तरी तो नमस्कार करतो. तसेच हत्तीचे होते. जोखडातच राहिल्यामुळे, जोखड काढले तरी हत्तीला आपण स्वतंत्र आहोत हे समजत नाही..आणि तो त्याच जागी राहतो.. (मी हे ऐकले आहे.. की हत्तीला काही दिवस साखळदंडांमध्ये ठ्वेअले की.. त्या जागी उभे केल्यावरही त्याला आपल्या पायात साखळ्या असल्यासारखेच वाटते)
<<<

येथे जोखड मानेवर की पायांत हे (फक्त माझ्यामते) विशेष महत्वाचे नाही. तुमच्या प्रतिसादातील मी ठळक केलेले विधान महत्वाचे वाटते. तुम्ही तसा अर्थ घेतलात, त्यानुसार तो शेर आहे की नाही हे बघायला हवे. तसे पाहिले तर असे जाणवते की 'जोखडाची सवय झालेल्या हत्तीचे' 'जोखड काढून घेतले गेले आहे' हे शेरात कोठेही स्पष्ट होत नाही. ते स्पष्ट झाले तर तुम्हाला वाटलेल्या अर्थानुसार शेर नक्कीच होईल. Happy

३ तुम्ही जी गरीब मुल आणि श्रीमंत मूल अशी प्रतिके दिली होती.. त्यात मी राजहंस आणि बगळा अशी प्रतिके घेतले आहेत.<<< शेर जवळपास अचूकच आहे असे मी तरी म्हणेन! 'जवळपास' याचे कारण बकध्यान हा शब्द अनेकदा 'लबाड माणसाने लावलेले ध्यान' (जे मासे पकडण्यापुरतेच मानभावीपणे लावलेले असते) अश्या अर्थाने वापरले जाते. कदाचित राजहंस आणि कावळा हे प्रतीक अधिक अचूक ठरले असते.

४. तुम्ही निर्भयाचे उदाहरण दिले होते.. तसे मी माझ्या रिवाज मोडण्याने उठलेले वादळ.. असा अर्थ लावून लिहिला आहे शेर.<<< तुम्ही शेराचा एक वेगळा अर्थ 'मानून' शेर केलात तर गैर काहीच नाही, पण तशी किंचित नोंद गझलेखाली असली तर बरीचशी चर्चा वाचेलही Happy

५. तुम्ही आईचे उदाहरण दिले. ती जेव्हा घरट्यात गेली तेव्हा पिले उडून गेली होती. मी माझ्या गावाबद्दल लिहिले आहे. मी माझा गाव, वाडे पहायला गेले तेव्हा ते पाडून तिथे इमले बांधले गेले होते..<<<

येथे तुम्ही उलटा प्रवास केलेला दिसतो. मी (म्हणजे संकेत तरहीसाठी खयाल देणार्‍याने) दिलेला खयाल तुम्ही प्रतीक मानला आहेत आणि ते कश्याचे प्रतीक असू शकते असा उलट दिशेने प्रवास करत तुम्ही या अर्थापर्यंत पोचला आहात. (हे 'एक प्रकारे' विशेष व वेगळेच आहे, पण येथे अभिप्रेत नाही. ) येथे दिलेला खयाल प्रतीकांमधून शक्य तितक्या अचूकतेने उतरवायचा असून दिलेल्या खयालाचा वेगळाच अर्थ काढायचा असे अभिप्रेत नाही आहे.

Happy

असो. हे फक्त गंमतीशीर चर्चेपुरते मुद्दे, 'एक गझल' या दृष्टीने सर्वांच्याच गझला छानच!

धन्यवाद व चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

तुमचा प्रतिसाद म्हणजे अभ्यास न करता वर्गात घुसून हवेत गोळीबार करणा-या, डिग्र्यांनी मढलेल्या तोतया प्राध्यापकी अविर्भावातला वाटला!<<<

Lol

पटवर्धन-गोखले महोदया,
उमेश..
अरे चक्क चक्क तू प्राध्यापक महाशयांना शिकवतो आहेस? इन्फॅक्ट ही नीड्स इट. आता तूच शिकव बाबा त्याला बघू काही शिकतो का? की पालथ्या घड्यावर पाणी?? <<<<<<

प्रथम तू स्वत:(क्षमस्व आपण स्वत:)
शिकून काय दिवे लावलेत ते पहा, मग कुणाला बिनबुडाचे आदेश कर (करा)! मग पहा आपला घडा पालथा आहे की उलथा आहे ते!
टीप: इथे पाठ थोपटून घेणा-यांचे बाहेर मुशाय-यात काय होते हे परवाच आम्ही प्रत्यक्ष जोडीने पाहिले! टाळ्यांचा जयघोष, सुन्न शांतता व रसिकांच्या गुजगोष्टी.......सर्व काही!

बेफीजी, मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहतेय. <<<<<<<< वाटच पहा आपण पाठ थोपटून घेण्याची!

@देवपूरकर..
दोन चांगली माणसे बोलत असताना आपण त्यात बोलू नये हे साधे शिकवलेले नाही बहुतेक तुम्हाला. शिकून घ्या बरं लवकर!!<<<<<<<<<

दोन चांगली?????की एक ते ठरवा व तो एक माणूस कोण तेही ठरवा!
आम्ही पेशाने प्राध्यापक आहोत! आमचा पेशाच मुळी मौखिक स्वरूपाचा आहे, तेव्हा बोलण्यातले आम्हाला कुण्या सोमीगोमी व्यक्तीने सांगायची गरज नाही! आपण काय शिकलो, आपली पोच किती? आपण नेमके कुठे उभे आहोत, आपण काय बोलतो, हे आधी पहायला शिका! स्वत:ची काळजी केलीत तरी खूप झाले!
............प्रा.सतीश देवपूरकर



वरील सर्व मुद्रा एकाच माळेतील बर का!

वायरी तुटलेला,
शेवटची भावमुद्रा तुमची का? नाही, दात पडलाय म्हणून इचारले<<<<<<
आपण धारण केलेल्या नावाच्या बुरख्यावरूनच आपल्या अभिरुचीचा अंदाज येतो!
ती भावमुद्रा आपली भावीमुद्रा आहे! पाहून ठेवा आताच!

ही पण आपलीच मुद्रा आहे बर का ............वायरी तुटलेली!

आपण धारण केलेल्या नावाच्या बुरख्यावरूनच आपल्या अभिरुचीचा अंदाज येतो!
ती भावमुद्रा आपली भावीमुद्रा आहे! पाहून ठेवा आताच!<<<

Rofl

भूषणराव द्या टाळी!
आजच्या दिवसात फारच करमणूक झाली बाबा इथल्या एकेक नगामुळे! नमुने आहेत रे बाबा नुसते!

भूषणराव तुम्ही फारच सौम्य लाठीमार केला बर का !
कदाचित स्त्रीदाक्षिण्यामुळे असेल!
पण एक गोष्ट निश्चित की सोनारानेच कान टोचलेले गोड लागतात! मग त्याची वाट पहायला लागली तरी हरकत नाही! (आमची निरिक्षणे या गझलेवरील आपण वाचली असे गृहीत धरतो)
असो! कुणाच्या तरी आरवण्याने उजाडते ना, मग ठीक आहे! कोंबडा कोणता का असेना!

टीप: तो वैभ्या तिकडे तडफडतोय संकेत गझल माझी संकेत गझल म्हणून ! त्याला शमवलत का?
आमची संकेत स्मयलीची कल्पना कशी वाटली?..........खरे खरे सांगायचे बर का!

स्मायलींनी दमला असाल म्हणून नुसताच गालात हसून प्रतिसाद संपवतो!
शुभरात्री!

कोंबडा कोणता का असेना!<<< Rofl

टीप: तो वैभ्या तिकडे तडफडतोय संकेत गझल माझी संकेत गझल म्हणून ! त्याला शमवलत का?<<< Rofl

आमची संकेत स्मयलीची कल्पना कशी वाटली?..........खरे खरे सांगायचे बर का!<<<

संकेत स्मायली Lol

त्या संकेत स्मायलींमागील मूळ खयालही लिहिले गेले तर 'इव्हॅल्युएट' करणे शक्य आहे Proud

-'बेफिकीर'!

देवपूरकर तुमच्या बिनडोक स्मायलींचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही.

@ भूषणराव, काही मुद्दे पटले.
मतल्यामध्ये, मी मोराचा उल्लेख करायला हवा होता. म्हणजे मला जे म्हणायचे होते ते स्पष्ट झाले असते. आभाळ आणि मोर... असा संबंध घेतला आहे.

दुसर्‍या शेरात, स्वातंत्र्य , म्ह्णजेच जोखडातून मुक्ती.. असा अर्थ घेऊन मी, जोखड काढले आहेत हे उल्लेख केला नाही. पण मला वाटते तसा करायला हवा होता.

संस्कृत सुभाषित आहे एक.."माता शत्रू पिता वैरी, ये न बालो ना पाठीता:, न शोभते सभामध्ये हंस मध्ये बको तथा|" अर्थात या सुभाशिताचा संकेताशी काही संबंध नाही. पण त्यांनी.. हंसांच्या सभेमध्ये बगळा.. अशी काहीशी कल्पना त्यात दिलेली आहे. आणि मग मी ती वापरायची ठरवली. हंस आणि कावळा अशी कल्पना करुन लिहून बघते. कदाचित काही वेगळा शेर होईल.

चौथ्या शेरात मला अजूनही तुम्ही काय म्हणाताय हे समजलेले नाही. निर्भया प्रकरण गाजले तसे शांत झाले. माझ्या वागण्याने कर्मठ लोक चिडले, पुढे थयथयाट झाला आणि मग शांत झाले.. नेमके यात संकेत म्हणून काय चुकले समजत नाही. एकदा पुन्हा स्पष्ट कराल का?

पाचव्या शेरातही उलटा प्रवास म्ह्णजे अजूनही नाही समजले. मी जेव्हा गाकाकडे गेले.. जुने वाडे गाव वगैरे बघायला ( शहरापासून दूर) तर तिथे मला वाडे जाऊन इमले/इमारती/बंगले दिसले.. संकेतांचा अर्थ (अब पछताए क्या होगा जब चिडीया चुग गर्यी खेअसा) असा काढला मी. त्यामुळे नेमके काय ते पुन्हा एकदा स्पष्ट कराल का?

या निमित्ताने चांगली चर्चा होतेय याचा आनंद होतोय.
धन्यवाद.

चौथ्या शेरात मला अजूनही तुम्ही काय म्हणाताय हे समजलेले नाही. निर्भया प्रकरण गाजले तसे शांत झाले. माझ्या वागण्याने कर्मठ लोक चिडले, पुढे थयथयाट झाला आणि मग शांत झाले.. नेमके यात संकेत म्हणून काय चुकले समजत नाही. एकदा पुन्हा स्पष्ट कराल का?<<<

निर्भयावर अन्याय झाला होता. तुम्ही घेतलेल्या प्रतीकात कवीने रुढी मोडलेल्या आहेत व कर्मठ लोक चिडले आहेत व कालांतराने शांत झाले आहेत. पूर्ण भाव वेगळा आहे. निर्भया प्रकरणात झालेला अन्याय देशाला रस्त्यावर आणण्याइतपत तीव्र होता पण तोही कालांतराने विस्मृतीत गेला असा मूळ खयाल आहे. निर्भयाने रुढी मोडलेल्या नव्हत्या, तिच्यावर समाजातील कोणताही परंपरावादी अथवा अन्य गट चिडलेला नव्हता. सगळे तिच्या बाजूने आपापली झुंज आपापल्या शैलीने देत होते. कालांतराने निर्भया प्रकरण विस्मरणात गेले ही खंत हा या शेराचा आत्मा आहे. तुमच्या शेरातील कवीने रुढी मोडलेल्या आहेत आणि त्यावर प्रथम चिडलेले कर्मठ लोक नंतर शांत झालेले आहेत. हे वाचून 'निर्भया प्रकरणाची' आठवण नेमकेपणाने येत नाही असे माझे म्हणणे आहे.

Happy

पाचव्या शेरातही उलटा प्रवास म्ह्णजे अजूनही नाही समजले. मी जेव्हा गाकाकडे गेले.. जुने वाडे गाव वगैरे बघायला ( शहरापासून दूर) तर तिथे मला वाडे जाऊन इमले/इमारती/बंगले दिसले.. संकेतांचा अर्थ (अब पछताए क्या होगा जब चिडीया चुग गर्यी खेअसा) असा काढला मी. त्यामुळे नेमके काय ते पुन्हा एकदा स्पष्ट कराल का?<<<

कुटुंबाला द्यायला वेळ नव्हता, शेवटी जेव्हा वेळ मिळाला तेव्हा कुटुंबच विखुरलेले होते (कुटुंबातील लोक इकडे तिकडे कायमचे निघून गेलेले होते) असा मूळ खयाल आहे. आता संकेत तरही म्हणजे हा खयाल दुसर्‍या प्रतिमा वापरून मांडायचा. सुलटा प्रवास केव्हा होईल? जेव्हा तुम्ही वापरलेल्या संकेतांमधून मूळ खयाल जाणवेल. म्हणजे समजा तुम्ही असे म्हणालात की 'माझा डाव लागण्यासारखी पाने एकदाची माझ्या हातात आली तेव्हा काही ना काही कारणाने सगळेच डाव अर्ध्यावर सोडून उठून गेले' तर मूळ खयाल निदान किंचित तरी जाणवेल. म्हणजे आपण म्हणत आहोत त्यातून संकेत तरहीसाठी दिलेला मूळ खयाल रसिकाला जाणवायला हवा, हा सुलटा प्रवास झाला. आता उलटा प्रवास म्हणजे असा, की मूळ खयालावरून तुम्हाला एक वेगळीच अनुभुती आठवली अथवा सुचली आणि ती तुम्ही शेरात गुंफलीत. तुमच्याच उदाहरणानुसार, तुम्हाला जुने वाडे बघायला मिळतील ही अपेक्षा होती पण प्रत्यक्षात दिसल्या रुक्ष इमारती! आता या खयालात 'कवीला शेवटी कुटुंबाला द्यायला वेळ मिळाला तेव्हा' हा महत्वाचा भाग कुठेच कव्हर होत नाही आहे. म्हणजेच असे होत आहे की तुम्हाला मूळ खयालावरून काही वेगळेच सुचले आहे व त्याचा शेर झाला आहे. म्हणजेच येथे तुम्ही मूळ खयाल हा एक प्रतीक मानले आहेत व त्यावरून तुमच्या मनाच्या तळाशी त्या प्रतीकाला साजेशी जी अनुभुती तुम्हाला जाणवली ती शेरात उतरली आहे. हा आपल्याला अभिप्रेत असलेल्या संकेत तरहीच्या प्रक्रियेच्या नेमका उलटा प्रवास झाल. हे असे होणे गैर अजिबातच नाही, पण निव्वळ या धाग्यापुरते पाहायचे झालेच तर संकेत तरहीची अट पाळत नाही आहे असे माझे मत आहे.

कृ गै न Happy

-'बेफिकीर'!

अगदीच यांत्रिक तुलना करायची झाली तरः

४ हे उत्तर हवे आहे असे ठरल्यावर ते २ + २, १ + ३, ५ - १ अश्या विविध मार्गांनी देता येईल. असा प्रयत्न करताना कोणी चुकून पावणे चार, कोणी साडे चार अशी उत्तरे आणून दाखवेल व नेमका खयाल सांकेतीकरीत्या सादर करण्यात किंचित अपयशी ठरेल. एखादा अचूकपणे चार हे उत्तर आणून दाखवेल.

पण तुमच्या शेवटच्या शेरात तुम्हाला 'चार' या उत्तरावरून 'पाच' हे उत्तर ज्या गणिताचे येते ते गणित सुचले आहे आणि ते तुम्ही शेरात गुंफले आहेत.

हे माझे वैयक्तीक मत आहे. (इतरांचीही मते घ्या).

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजले मला. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा... म्हणजेच.. बराच काळ वाट पाहिल्यावर.. हा इसेन्स आहे त्या संकेताचा असे वाटते. वेटिन्ग आफ्टर लाँग पिरियड.. गॉट समथिंग बट इट वॉज इन व्हेन्न! बरोबर ना?

होय.

टक्कल पडले, अक्कल येईल, यु जी सी ला खात्री नाही
मेंदूमधले किडके कापू, त्यांचे; ऐशी कात्री नाही....
(यु जी सी - अनस्टॉपेबल ग्रोथ ऑफ धीस कार्टून)

Pages