मनाचे सांगताना फक्त सुचती दोन ओळी.. (संकेत तरही)

Submitted by रसप on 24 February, 2013 - 00:51

'मायबोली'च्या 'संकेत तरही' उपक्रमात माझा सहभाग..

मला ना त्रास होतो स्वप्नही तू टाळण्याचा
मनाला क्लेश असतो रात्रभर मी जागल्याचा

समज आली तशी आई मला सोडून गेली
तरीही भास का होतो कुणी कुरवाळल्याचा ?

तिच्या मी बंगल्याला पाहतो चोरून थोडे
पुन्हा निर्धार करतो झोपडी शाकारण्याचा

कुणी विध्वंस केल्यावर किती संताप येतो
मला आनंद मी त्यातून सुखरुप वाचल्याचा !

मनाचे सांगताना फक्त सुचती दोन ओळी
'जितू' तो काळ सरला मुक्त कविता वाहण्याचा !

-------------------------------------------------------------

मला ना त्रास होतो भोवती अंधारल्याचा
मनाला क्लेष वाटे सावलीने टाळण्याचा

फुले ही पारिजाताची सुगंधाला उधळती
असावा शाप त्यांना पण लगेचच वाळण्याचा

….रसप….
२ फेब्रुवारी २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/blog-post_24.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खालील शेर खूप आवडले ,

समज आली तशी आई मला सोडून गेली
तरीही भास का होतो कुणी कुरवाळल्याचा ?

तिच्या मी बंगल्याला पाहतो चोरून थोडे
पुन्हा निर्धार करतो झोपडी शाकारण्याचा

कुणी विध्वंस केल्यावर किती संताप येतो
मला आनंद मी त्यातून सुखरुप वाचल्याचा !

मी केलेली रचना पाहून ; संकेत तरही ही संकल्पना मला व्यवस्थीत समजली आहे की नाही अशा विभ्रमात मी असल्याने मी विस्तृत प्रतिसाद देणे बरोबर नाही असे मानून टाळतो आहे
क्षमस्व

छान.
तिच्या मी बंगल्याला पाहतो चोरून थोडे
पुन्हा निर्धार करतो झोपडी शाकारण्याचा>>>>>
हे खुप आरपार हवे होते यार! बहोत बडी बात है इसमे..

"समज आली तशी आई मला सोडून गेली
तरीही भास का होतो कुणी कुरवाळल्याचा ?

तिच्या मी बंगल्याला पाहतो चोरून थोडे
पुन्हा निर्धार करतो झोपडी शाकारण्याचा" >>>> हे दोन सर्वात आवडले.

कुणी विध्वंस केल्यावर किती संताप येतो
मला आनंद मी त्यातून सुखरुप वाचल्याचा !

मनाचे सांगताना फक्त सुचती दोन ओळी
'जितू' तो काळ सरला मुक्त कविता वाहण्याचा !<<<

मस्त शेर

=========

एकुण, तरही गझल ही संकल्पना अधिक स्वच्छ करायला हवी होती असे ( काही प्रमाणात माझी स्वतःचीही गझल वाचून ) वाटू लागले आहे.

कणखरजी म्हणताय्त म्हणून संपादित Happy
चर्चा तरहीच्या धाग्यावर करू शकता .................
अवश्य सहभाग घ्यावा
गेलाबाजार माझे विचार तरी वाचाच बरका Happy

आमची निरिक्षणे...........

१) मतला फसला रे फसला!
स्वप्न टाळणे की, तुझे माझ्या स्वप्नात येणे टाळणे?

अन् स्वप्नेच हवी होती तर मग रात्रजागरण (कोजागिरी) ते कशाला?

जागेपणी जो स्वप्ने बघतो त्याला काही तरी वेगळेच म्हणतात ना?

२) अप्रतिम शेर! अभिनंदन!

३) सुंदर शेर! वा!

४) बरा सदरात मोडतो!

५) अर्थ पोचत नाही!

६) अंधार व सावलीने टाळणे............. प्रतिमांचे नाते धूसर वाटले.

७) सुगंधाला उधळती............वृत्तशरणता उघड उघड!

लगेचच वाळणे हे काय फक्त पारिजातकाच्याच बाबतीत होते काय?

टीप: संकेत तरही सदरातील शेरनिहाय संभाव्य स्थाने...............

शेर१..........ओढूनताढून आणल्यासारखा!

शेर२ ...............अप्रतिम शेर.......पूर्णपणे यशस्वी!

शेर३...............सुंदर शेर...........यशस्वी!

शेर४ ..........बरा सदरातला!

शेर५ ................अर्थ पोचत नाही!

निरिक्षणकार,
............प्रा.सतीश देवपूरकर

वैभू!
आमच्याही तरहीला आपली निरीक्षण-धूळ लावून पवित्र कराल काय<<<<<
का नाही?
पण जर तुझी तरही धुळीने माखली तर जबाबदारी आमची नाही हो!
आधीच सांगून ठेवतो, नंतर कुरबुरी नकोत!

गझलधूळनिरिक्षक,
प्रा.सतीश देवपूरकर

निरीक्षक साहेब आमच्याही तरहीला आपली निरीक्षण-धूळ लावून पवित्र कराल काय>>>>

याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण!! पवित्र आणि देवपूरकरांची धूळ!! सांभाळा वैभवराव.. उकिरडा घरात आणू नका.

हा हा हा आठवा ते धाडसाचे आव्व्हान !!! काय हालत केली होती देवसरांची सर्वांनी.........

ते आठवून त्याच जमीनीत हा नवा शेर तयार !!!!!!!!!!! Lol

मी पवित्र झालो आहे न्हाऊन भीवरेमध्ये
हा धूळनिरीक्षक पाहुन मळण्याचे धाडस केले

Lol