रंगपंचमी

Submitted by जिप्सी on 24 February, 2013 - 00:28

फाल्गुन पंचमी म्हणजेच रंगपंचमी आता महिन्यावर येऊन ठेपली आहे, पण निसर्गात रंगीबेरंगी फुलांची हि रंगपंचमी केंव्हाच सुरु झाली. निसर्गदेवतेने लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा अशा विविध रंगांचे घटच्या घट या फुलांवर रीते केले आहेत. फक्त नजर पाहिजे ती या सौंदर्याला टिपणारी. फार पूर्वी शाळेत असताना पाठ्यपुस्तकात कि कोणत्यातरी गोष्टीच्या पुस्तकात वाचलेली एक गोष्ट हा रंगोत्सव पाहताना आठवली. ती काहिशी अशी...

फार फार वर्षापूर्वी म्हणे एकाही फुलाला रंग नव्हता. सगळी फुले पांढरीच. गुलाब, अबोली, चाफा, मोगरा, केवडा, शेवंती इ. सारी फुले पांढरीच. या फुलांकडे मनाला धुंद करणारा सुवास होता पण मन मोहणारे रंग मात्र नव्हते. सर्व फुलांना याचे फार वाईट वाटायचे. आभाळात इंद्रधनुचे रंग पाहिल्यावर आपल्याला पण असे रंग असावेत असे मनात यायचे. शेवटी त्यांनी आभाळाकडे आपले म्हणने मांडायचे ठरवले आणि त्याप्रमाणे इंद्रधनुष्याप्रमाणे आम्हालाही रंगीबेरंगी करा म्हणुन विनंती केली. आभाळानेही त्यांची हि विनंती एका अटीवर मान्य केली. ती अट अशी की फक्त एका दिवसांसाठी सगळ्या फुलांना रंग मिळतील, मात्र दुसर्‍या दिवशी हे रंग पुन्हा आभाळाला परत करायचे. एक दिवस तर एक दिवस. फुलांचे हे स्वप्न साकार होणार म्हणुन त्यांनी लगेच होकार भरला. ठरल्याप्रमाणे आभाळाने फुलपाखरांना बोलावून त्यांच्यासोबत रंगाचे घडे दिले आणि हे सारे रंग फुलांना देण्यास सांगितले. फुलपाखरं हे सारे घडे घेऊन पृथ्वीवर आले आणि त्यांनी एका एका फुलांवर हे रंगाचे घड उलटवण्यास सुरूवात केली. बघता बघता सारी फुले विविध रंगात न्हाऊन गेली. हि फुले इतकी होती कि फुलपाखरांकडे असलेले रंगाचे घड संपून गेले आणि काहि फुले मात्रा पांढरीच राहिली. स्वतःचे रंगिबेरंगी रूप फुलांना इतके आवडले कि त्यांनी दुसर्‍या दिवशी हे रंग आभाळाला परत न देण्याचे आणि कायम याच रंगात राहण्याचे ठरवले. आभाळाने दुसर्‍या दिवशी रंग परत मागितल्यावर त्यांनी ठाम नकार दिला. शेवटी आभाळाने फुलपाखरांना बोलावून पुन्हा रंग घेऊन येण्यास सांगितले. आभाळाचा हा निरोप घेऊन फुलपाखरं या रंगिबेरंगी फुलांवर येऊन त्यांना रंग परत करण्याची विनवणी करत आहे, पण फुलं मात्र ते देण्यास चक्क नकार देत आहे. आजही बिचारी फुलपाखरं सकाळी लवकर उठुन आभाळाचा हा निरोप घेऊन विविध फुलांवर फिरत आहे आणि संध्याकाळी निराश होऊन परत आपल्या घरी परतत आहेत. फुलं मात्र नविन रंग मिळाल्याच्या आनंदात वार्‍यावर डोलत आहेत. Happy

चला तर पाहुया निसर्गाची हि रंगपंचमी माझ्या नजरेतुन. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

(वरील सर्व प्रचि जिजामाता उद्यान फुल/पुष्प प्रदर्शन, सागर उपवन (कुलाबा) आणि पेण येथे काढली आहेत.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारे काही नेहमीचेच पण कॅमे-याच्या डोळ्यांमध्ये अशी जादू आहे की सगळेच देखणे दिसायला लागते...

गुलाबी वाट अतिशय सुंदर.. कुठून चालायचे असा प्रश्न पाडणारी..

सारे काही नेहमीचेच पण कॅमे-याच्या डोळ्यांमध्ये अशी जादू आहे की सगळेच देखणे दिसायला लागते.>>>>+१०००००

ती गोष्ट पण मस्त!!

गोष्ट मस्तंय.. बरं झालं फुलांनी रंग परत केले नाही ते!!!
आहाहा.. कसले ब्राईट्,चकचकीत ,फ्रेश रंग आहेत.. ब्यूटी!!!

नेहमीप्रमाणेच अफलातून. कॅलेंडर्ससाठी फोटोग्राफी करत जा रे प्रोफेशनली >>>>>++१११:स्मित:

पहिले दोन - क्लासिक!

रच्याकने, हेच चुकवलं का मी? Sad

Pages