पाहतो ते फक्त पाय

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 February, 2013 - 05:53

आजकाल मी कुणाचेही
चेहरे पाहत नाही
पाहतो ते फक्त पाय
काय म्हणता ?
आदराने !
त्यांच्यात देवत्व पाहून !!
नाही हो !
माझा पाय मुरगळून
तीन महिने झालेत
तेव्हा पासून !
फारच हेवा वाटतो हो ,
मला तुम्हा सर्वांचा
दोन तंदुरुस्त मजबूत पाय
खाड खाड चालणारे
दण दण पळणारे
यात काय सुख असते
ज्याचे पाय मोडतात
त्यांनाच कळते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वानुभवचे बोल बाकी काही नाही ....पाय मुरगळला की लगेच मला कळवा .६ महिने लंगडल्यावर मी त्यात master झालो आहे .

ज्याचे पाय मोडतात
त्यांनाच कळते

मी पाय एक अवयव ह्या अर्थाने घेतले नव्हते.
देव करो आपल्याला कळविण्याची नौबत न येवो (गंमतीत).

कवितेचं संवादात्मक रूप आवडलं. पण तिला केवळ स्वानुभवाचा दर्जा देऊन संकुचित करणं आवडलं नाही. प्रत्येक कवितेत स्वानुभव असतोच. पण तिचा अर्थ वाचकसापेक्ष बदलत असतो.

संवादात्मकतेमुळे ही कविता थेट भिडते.
पाय मोडणे याला वेगवेगळे अर्थ प्राप्त होऊ शकतात आणि पाय हे आयुष्यावरचं एक रूपक (प्रतिक) ही ठरू शकतं.

स्वानुभव वैश्विक केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

राजीवजी ,मान्य आहे .कविता लिहायचे ते निमित्तच ....
<<<<<मी पाय एक अवयव ह्या अर्थाने घेतले नव्हते.>>>समीरजी ,.. उशिरा ट्यूब पेटली .
धन्यवाद ,वैभव.समीरजी , राजीवजी