कवीचे प्राक्तन

Submitted by उमेश वैद्य on 22 February, 2013 - 10:36

कवीचे प्राक्तन

तापले वास्तव खाली
पाउल मनाचे जाळी
कोरड्या ओठांवरती
चार कवितेच्या ओळी
मी कवी!

'भ्रमिष्ट' म्हणती जरा ते
भोवती कुजबुज चाले
काहीच त्याचे नाही
कवितेचे धुंद प्याले
मी कवी!

शिशिराचे गळता पान
जीवघेणी ह्रुदयी कळ
कविताच घेउन येते
पुष्पांची वसंत सळसळ
मी कवी!

अर्थ जहरी फुटताना
शब्दांची चिरते जीभ
ओळींच्या अपूर्णतेची
चालते अखंड तगमग
मी कवी!

वेचताना शब्दांचे
विखुरले कंच टपोरे
हात जोडूनच येती
काव्याची रांगत पोरे
मी कवी!

प्राक्तन कवीचे आहे
माथ्यावर जळते ऊन
तशातच नव-कवितेची
कानात गुंजते धून
मी कवी!

उ. म्. वैद्य २०१३.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'भ्रमिष्ट' म्हणती जरा ते
भोवती कुजबुज चाले

कवीने कुणाची पर्वा का करावी ? एकंदर आशय चांगला आहे.
( एक का असेना पण दर्दी रसिक न मिळणे हे असणे हे दुर्दैव ! पण हे प्राक्तन कुणाचे ?)

कवितेचा आशय आणि
"शिशिराचे गळता पान
जीवघेणी ह्रुदयी कळ
कविता घेऊन येते
पुष्पांची वसंत सळसळ" >>>> हे सर्वात आवडले.

शिशिराचे गळता पान
जीवघेणी ह्रुदयी कळ
कविता घेऊन येते
पुष्पांची वसंत सळसळ
मी कवी!

मस्त ,आवडली.

@एक प्रतिसादक
कवीने कुणाची पर्वा का करावी ? >>>>
म्हणजे कवी बेपर्वा असतात अस म्हणायचय की काय तुम्हाला? Happy