साग्रसंगीत

Submitted by जयनीत on 21 February, 2013 - 09:55

' हॅप्पी न्यू इयर ' फार जल्लोषात म्हटले
आयुष्य सुरु झाले पुन्हा जुन्या क्रमाने

' हॅपी बर्थ डे ' मित्रांनी सुरात म्हटले
वागू लागले नंतर नेहमीच्या थंडपणाने

अंतरपाटा आड खूप आनंदी होती दोघे
सुप्तपणे सुरु झाले मग पति पत्नीचे गा-हाणे

पुत्र मित्र आप्तांची शोकसभा साजरी झाली
झाले सैल मोकळे श्वास स्मशानातच क्षणभराने

झाला अखेरचा शृंगार फोटोस लागला हार
संपले आयुष्य साग्रसंगीत परंपरे प्रमाणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीर धन्यवाद, एक चुक झाली होती ती सुधारली.
दोन ओळी अस्थानी आल्या होत्या असे वाटते.

परंपरे प्रमाणे सर्व काही घडले तरीही मनात रुख रुख राहुन जातेच जे काही जगतो आहे त्यात काय खरं अन काय खोटं अन अपूर्ण आहे ते कळतंही आणि काहीही करु शकत नाही त्या बद्दल आहे.

कथा पोहचतेय आता. स्मशानाचा उल्लेख असलेल्या ओळी समजल्या नाही.
अकबरचा एक शेर आठवला:

हम क्या कहे अहबाब क्या कारे-नुमाया कर गए
बी ए हुए, नौकर हुए, पेंशन मिली, फिर मर गए

(अहबाब: यार, कार-नुमाया: उल्लेखनीय कार्य)

धन्यवाद.

धन्यवाद समीर,
खरं म्हणजे ' हॅपी बर्थ डे ' कल्चर वर लिहायच मनात होतं काही लोक स्वत:च्याच गळ्यात हार टाकून धन्य होतात.
सामान्य माणुस वाढदिवस, लग्न वगैरे ह्यासारख्या दिवशीच थोडाफार महत्वास पात्र समजल्या जातो.
असो.
स्मशानातल्या ओळीं बद्दल,
जितकं माणूस अपेक्षा करतो तितक दुख: अनेकदा मुलांनाही होतंच असं नाही. आप्त, मित्र ह्या बद्दल ही फारसे वेगळे काय असते? (अर्थात अपवाद सोडून) आपणही नेहमीच दोन मिनिटे स्मशानात उपचाराचे मौन पाळतो त्यात नाटक करतो असे नाही पण तेव्हढीच मर्यादा असते ' झाले सैल मोकळे श्वास ' हे त्या दोन मिनिटांच्या नंतरच्या क्षणात वाटणा-या भावनां बद्दल म्हणायचे आहॆ.
अकबर ह्यांचा शेर खरच खूप सुंदर आहे त्यांच्या लिखाणाचा विनोदी मूड नेहमीच आवडतो अन फार गंभीर गोष्ट खूप साधे पणे लिहिण्याची हातोटी पण.
पुन्हा एकदा धन्यवाद.

वा छान
जयनीतजी ऐल्पैल्वर तुम्हाला पाहिले त्यानंतर आजच खूप महिन्यानंतर.......
खूप छान वाटले तुम्हाला पाहून
लेखन देखील छान झाले आहे

धन्यवाद वैभव, जे लिहायचं होतं ते फारसं उतरलच नाहॆ. असो, मायबोली वर मी ब-याच काळापासून आहे पण इथे काव्य विभागात मात्र आताच आलो. इथे तुमचा संचार मात्र सर्वत्र दिसून येतो. लेखनही वाचतो आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

आवडली .